नेवासा
फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय, सोनई महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी (RAWE & AIA ) ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नक अंतर्गत खेडले काजळी गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले
. या मध्ये सैवर रुद्र,मोरे ओंकार,पाचोरे सार्थक,चैधरी पृथ्वीराज,साबळे आतिश,ढोके प्रज्वल,शिदे ज्ञानेश्वर यांचा समावेश असून ते शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.तसेच गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती समाजातील सामाजिक स्थिती पीक पद्धती इ. विविध गोष्टीचा अभ्यास करणार आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत ,
माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण,बीज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे , उपप्राचार्य प्रा. सुनिल व्हि. बोरुडे , कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी श्री.श्रीकृष्ण एस. हुरुळे,डॉ. एस.बी.चौगुले , प्रा.डॉ.निर्मला एन. विधाते ,व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
या प्रसंगी गावचे सहायक कृषी अधिकारी श्री राहुल दांडगे साहेब,माजी. सरपंच श्री बाळासाहेब कोरडे ,संजय उदे, कल्याण उदे, नारायण उदे,नारायण कोरडे,रविंद्र कोरडे आणि इतर गावकरी.
सर्व गावकऱ्यांनी कृषिदूताचे स्वागत केले.

