नेवासा :::
भाजीपाला पिकासाठी उत्पादन खर्चावर आधारित वैधानिक आधारभूत किंमत ठरविण्यासाठी राज्य व देशपातळीवर सक्षम यंत्रणा उभी करावी, असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.
तालुक्यात कार्यरत ज्येष्ठ नागरिकांच्या संजीवन ग्रुपच्या विचारमंथन मेळाव्यात ते बोलत होते. या ग्रुपमध्ये शैक्षणिक, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू सदस्यांचा सहभाग आहे. विचारमंथन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उपप्राचार्य भैय्यासाहेब देशमुख होते. कार्यक्रमास काशिनाथ अण्णा नवले, तुकाराम मिसाळ, कडबाळ कर्डिले यांच्यासह संजीवन ग्रुपचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. ढगे यांनी भारत–युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार तसेच अमेरिका–भारत करार यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजीपाला पिकांसंदर्भात ठराव मांडताना उत्पादन खर्चावर आधारित वैधानिक आधारभूत किंमत ठरविण्याची गरज व्यक्त केली. भाजीपाला उत्पादन अत्यंत कष्टाने केले जाते; मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या ठरावावर झालेल्या चर्चेत प्रा. बी. जी. काळे, प्रा. वाय. बी. शेख, रामदास कोरडे, अध्यक्ष साहेबराव गणगे व रामकृष्ण नवले यांनी सहयोग नोंदविला. सखोल चर्चेनंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी माजी प्राचार्य वाबळे, दिलीपराव कोठुळे, प्रा. खाटीक, प्रा. अशोक देशमुख, अध्यक्ष साहेबराव गणगे व प्राचार्य कल्हापुरे यांनीही आपले विचार मांडल
भाजीपाला पिकासाठी उत्पादन खर्चावर आधारित किंमत ठरविण्यासाठी देशपातळीवर सक्षम यंत्रणा उभारावी-डॉअशोकराव ढगे
Jalgaon
few clouds
32.2
°
C
32.2
°
32.2
°
37 %
3.2kmh
20 %
Tue
37
°
Wed
38
°
Thu
35
°
Fri
36
°
Sat
35
°

