मका किमान पंधराशे तर कंपोस्ट खत 2850 प्रमाणे दर जाहीर….
नेवासा (वार्ताहर) –
शेतकऱ्यांच्या हिताचे खरे प्रतिनिधित्व करत पंचगंगा ऊद्योगसमूहाने साखर उद्योगात पारदर्शकतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. काट्यातील प्रामाणिक वजन, योग्य ऊसदर आणि नव्याने सुरू होणारा मका प्रकल्प या तिन्ही माध्यमातून पंचगंगा शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत आहे. “काट्यामध्ये एवढी पारदर्शकता कुणीच ठेवलेली नाही, त्यामुळे आता इतरांनाही पंचगंगा शुगरप्रमाणे पारदर्शकता ठेवावी लागेल,” असे गौरवोद्गार महंत रामगिरी महाराज यांनी पंचगंगा साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी काढले.
महालगाव (ता. वैजापूर) येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा. लि. कारखान्याच्या मोळीटाकणीचा शुभारंभ महंत रामगिरी महाराज व उत्तमराव गोविंदराव शिंदे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठलराव लंघे, कुंडलिकराव माने अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे, माजी जि.प. सभापती अविनाश गलांडे सीए भाऊराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे म्हणाले, “पंचगंगा ऊद्योगसमूहाने प्रथम गळीत हंगामात जाहीर केलेला ₹२८५० दर शेतकऱ्यांना पूर्ण दिला. यंदा जादा रिकव्हरी देणाऱ्या वाणांना ₹३१५०, तर सर्वाधिक लागवड असलेल्या २६५ वाणासह इतर ऊसप्रकारांना ₹३०५० प्रति टन दर दिला जाईल.” या घोषणेनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
शिंदे पुढे म्हणाले, “सध्या परिसरात मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. जमिनीत ओलावा असल्याने शेतकऱ्यांना मका सुकविताना अडचणी येतात. म्हणूनच पंचगंगा उद्योगसमूह पुढील आठवड्यात मका डिस्टिलरी प्रकल्प सुरू करीत आहे. शेतकऱ्यांना कारखान्यावर मका आणण्यापूर्वी विनामूल्य मॉइश्चर टेस्टिंगची सुविधा दिली जाईल. बाजारभावानुसार दररोज भाव जाहीर केला जाईल आणि किमान ₹१५०० प्रति क्विंटल दरापासून सुरुवात होईल.”
महंत रामगिरी महाराज म्हणाले, “पंचगंगा ऊद्योगसमूहाने फक्त साखर कारखाना उभारला नाही, तर शेतकऱ्यांशी विश्वासाची गाठ बांधली आहे. काट्यातील पारदर्शकता आणि योग्य भाव या दोन गोष्टी शेतकऱ्यांच्या मनावर विश्वास निर्माण करतात. पंचगंगाचा हा नमुना इतर कारखान्यांसाठीही दिशादर्शक ठरेल.”
या वेळी आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी कारखान्याच्या कार्याचे कौतुक करत, “शेतकऱ्यांना योग्य दर, प्रामाणिक वजन आणि नव्या पिकांसाठी बाजारपेठ निर्माण करणारा पंचगंगा ऊद्योगसमूह खरोखरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरत आहे,” असे मत व्यक्त केले
पारदर्शक व्यवहार आणि शेतकरीहिताच्या धोरणांमुळे राज्यात पंचगंगा आदर्शवत उद्योग म्हणून प्रसिद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले
यावेळी अंकुश काळे ,प्रतापराव चिंधे, किशोर गारुळे, डॉक्टर करण सिंह घुले, राजू भाऊ मते, शिवाजी मते, बबनराव पिसोटे सतीश कर्डिले, सुरेश कारले ,कापसे पैठणी ऊद्योग समुहाचे बाळासाहेब कापसे, उद्योजक बाळासाहेब संचेती ,माजी सभापती बाबासाहेब जगताप , विजय पवार, बाळासाहेब पवार टेंभीकर, सरपंच नानासाहेब काळे,ऊपसरपंच सुरेश आल्हाट,डॉ प्रकाश शेळके, राजेंद्र गलांडे,भाऊरांव भराडे,शिवाजी बनकर,भाऊसाहेब झिंजुर्डे,मंगेश गायकवाड, बाबासाहेब शिंदे,विवेक शिंदे,बाळासाहेब शिंदे,कॅप्टन प्रशांत माने,सचिन माने,प्रबोध शिंदे,प्रविण पवार,मच्छिद्र पठाडे,तेजस शिंदे,प्रा.रंगनाथ कोळसे आदी ऊपस्थितहोते

