नेवासा
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रवरासंगम शाखेत नागेबाबा सन २०२६ विचारधन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम बाबासाहेब महाराज जाधव तसेच सरपंच सौ. अर्चनाताई सुडके यांच्या शुभहस्ते व आशीर्वादाने संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे कोअर मेंबर सचिन जाजू व एरिया मॅनेजर एकनाथ नांदे यांनी संस्थेच्या कार्यपद्धती, सामाजिक उपक्रम व भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास मोनीराज कदम, रामभाऊ काटकर, ज्ञानेश्वर कोरडे, ऋषिकेश शिंदे, कैलास कपिले, खाटीक मेजर, रमेश जोशी, आसाराम काळे, रमेश ललवाणी, नितीन गांधी, दरोडे साहेब, कचरू पांडव, बाबासाहेब गोत्राणे, संदीप कोरेकर यांच्यासह अनेक खातेदार, कर्जदार, ठेवीदार, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गणेश उदे, सागर कुंढारे, वंदना साळवे व रवींद्र जाधव यांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाखाधिकारी सुभाष पठारे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सभासदांचे आभार मानले.

