नेवासा(प्रतिनिधी)नेवासा येथील अमरनाथ ग्रुपच्या वतीने काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा त्रिव शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन मेणबत्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
अमरनाथ ग्रुपसह नेवासा येथील पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या इतर ग्रुप ही यावेळी झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झाले होते.नेवासा बाजार समितीच्या प्रांगणात पहाटेच्या सुमारास श्रद्धांजली कार्यक्रम मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या प्रेरणेने घेण्यात आला.
यावेळी नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते किशोर गारुळे,समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी निरपराध पर्यटकांवर केलेल्या हल्लाचा सूत्रधार पाकिस्तान असून झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध केला.आपण ही आता बाहेरुन आलेल्यांची चौकशी करावी त्यांच्याकडून वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले.
नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील म्हणाले की हा भ्याड हल्ला बेसावधपणे झाला आहे त्यात निष्पाप बळी गेले असल्याने अतिरेकी कारवाई करणाऱ्याचा शोध घेऊन भारताने देखील आता खमकी
भूमिका घेऊन तोडीस तोड असे उत्तर द्यावे त्यासाठी सर्व भारतीयांनी ही आता आपापसातील मतभेद बाजूला सारून देशाच्या एकोप्यासाठी संघटित व्हावे असे आवाहन केले.
यावेळी झालेल्या निषेध व श्रद्धांजली सभेप्रसंगी
अँड.तात्यासाहेब ढोकणे,मेजर अरुण धनक,गोरखभाऊ घुले,रामनाथ जाधव,दिलीप जगदाळे,शंभूराजे जंगले, प्रदीप पाठक,राजेंद्र महाजन,संदीप वाघ,भिकन सोनवणे, चिंटूकाका देशपांडे,पांडुरंग मते,अंबादास ईरले,शशिकांत नळकांडे,सुरेश शिंदे,भिकन सोनवणे,राजू पानसरे,सुभाष शेवाळे,कैलास वाखुरे उपस्थित होते
