spot_img
spot_img
HomeUncategorizedभगवान परशुराम जयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी

भगवान परशुराम जयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी

प्रतिनिधी |नेवासे 

 सकल हिंदू समाजाच्या सहभागातून, परशुराम प्रतिष्ठानतर्फे नेवासे येथे भगवान परशुराम जयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता. परशुराम जयंती उत्सव हा परिसरात सामाजिक ऐक्य, धार्मिक श्रद्धा व संस्कृती यांचे दर्शन घडवणारे ठरले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन प्रमोद देशपांडे, मयूर देवचक्के, सचिन देशपांडे, निलेश जोशी, बाळासाहेब पाटील, सुरेखा बल्लाळ व संजीवनी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात मृणालिनी मुळे यांनी भगवान परशुराम यांच्या जीवनकार्यावर प्रवचन केले. त्यांनी भगवान परशुरामांचे चरित्र आजच्या समाजासाठी आदर्श कसे ठरू शकते, हे प्रभावीपणे मांडले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे महंत देविदास महाराज मस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना आशीर्वाद दिला.

या प्रसंगी नेवासा उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी आजच्या तरुणांनी भगवान परशुरामांचे विचार आणि धैर्य अंगीकारून राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे, असे मत व्यक्त केले. जाई ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष अभिजीत अष्टेकर यांनी परशुराम प्रतिष्ठानच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, सर्व समाजघटकांना सहभागी करून घेणाऱ्या दृष्टीकोनाचे विशेष उल्लेख केले.

प्रतिष्ठानचे मार्गदर्शक उदय कुमार बल्लाळ व जयंतराव देवचक्के यांनी समस्त हिंदू समाजाला सोबत घेऊन एकतेचे कार्य करणे हे ब्राह्मण समाजाचे कर्तव्य आहे, असे सांगितले. सायंकाळच्या सत्रात, भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त नेवासा तालुका ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात सजवलेल्या रथामध्ये भगवान परशुराम यांच्या मूर्तीची स्थापना करून धार्मिक विधीनंतर पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या अग्रभागी श्री हनुमान भजनी मंडळाने भक्तिमय भजने सादर केली.शोभायात्रा औदुंबर चौक, विश्वेश्वरनाथबाबा चौक, श्री खोलेश्वर गणपती मंदिर, नगर पंचायत चौक मार्गे मार्गक्रमण करत श्री हनुमान मंदिर येथून पुन्हा श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात आली. मार्गात चौकाचौकात फटाक्यांच्या आतषबाजीत, पुष्पवृष्टीत आणि जयघोषात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत तालुक्यातील ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
28.3 ° C
28.3 °
28.3 °
70 %
7.8kmh
100 %
Mon
28 °
Tue
26 °
Wed
31 °
Thu
30 °
Fri
32 °

Most Popular

error: Content is protected !!