कुकाणा : [ प्रतिनिधी ] ऊस उत्पादन वाढीसाठी विविध घटकांचा विचार करता जमिनीचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आणि जिवाणू खताची जोड रासायनिक खताला आवश्यक आहे नेवासा तालुक्यातील जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले आहे सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे जमिनी भुसभुशीत राहिल्या नाहीत आणि उसावर ऊस वारंवार पीक घेतल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थ वाढविले पाहिजे कारण तो जमिनीचा आत्मा आहे. असे प्रतिपादन
कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे ऊस उत्पादन वाढ मार्गदर्शन शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग अभंग होते तर निखिल गोयीस ,हवामान पूरक शेती सल्लागार समीर मिर्झा, उदय वड्डी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय खाटीक यांनी प्रास्तविक केले तर बाळासाहेब खाटीक यांनी स्वागत केले.
माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ऊस शेतीत नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सामूहिक प्रयत्नांनी उत्पादनात वाढ साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्टिफिशियल इंटेलिजंट उसावर प्रयोग बारामती येथे निरीक्षणासाठी ९५ लोकांची टीम पाठवली होती. त्यांनी त्याचा अभ्यास केला व माहिती घेतली आणि त्याप्रमाणे उसाच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातील. असेही अभंग यांनी सांगितले.
या शेतकरी मेळाव्याचे आयोजन प्रगतशील शेतकरी दत्तात्रय खाटीक यांच्या शेतावर खोडवा ऊस व पाचट शास्त्रीय पद्धतीने नियोजन याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले व निरीक्षण केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामदेव गव्हाणे, देविदास खाटीक, महेश नागवडे , अक्षय चिडे, प्रमोद जाधव , पुनम खाडे , प्रसाद साळुंखे, स्वामिनी खुरुद यांनी परिश्रम घेतले. यावेळी पाथरवाला व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख पवन थोरात केले तर देविदास खाटिक यांनी आभार मानले . (सोबत फोटो आहे )
कुकाणा : पाथरवाला (ता. नेवासा ) येथील शेतकरी मेळावा व ऊस उत्पादन वाढ चर्चासत्र उद्घाटन प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे, हवामान पूरक शेती सल्लागार समीर मिर्झा, उदय वड्डी दत्तात्रय, खाटिक, बाळासाहेब खाटिक