नेवासा – राष्ट्रीय फेडरेशन भारतीय ग्राहक महासंघाच्या वतीने दिल्लीत भारतीय मानक ब्युरो (BIS) मुख्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिरात नेवासा तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष, “साईनिर्मल” फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध दिवाणी कायदेतज्ज्ञ अँड. सुदाम ठुबे यांची भारतीय ग्राहक महासंघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती प्रीती पांड्या आणि राष्ट्रीय चेअरमन अनंत शर्मा यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्र अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या माध्यमातून ही नियुक्ती जाहीर झाली. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करून फसवणूक टाळण्यासाठी “जागो ग्राहक जागो” ही चळवळ राज्यभर प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी ठुबे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल गोमळवाडी ग्रामस्थ तसेच नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. गणेश निकम, अँड. अजय रिंधे, अँड. नितीन अडसुरे, अँड. भारतभूषण मौर्य, अँड. बी. एस. शिरसाठ, अँड. भैयासाहेब देशमुख, अँड. मोशिन पठाण, अँड. खलिल पठाण तसेच आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड. सादिक शिलेदार, पोलीस पाटील आदेश साठे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले आहेत