spot_img
spot_img
Homeराजकारणअज्ञानाच्या झोपेतून संतांनी आपल्याला जागे केले — हभप उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर

अज्ञानाच्या झोपेतून संतांनी आपल्याला जागे केले — हभप उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर

नेवासा

अज्ञानाच्या झोपेतून संतांनी विचारांच्या माध्यमातून आपल्याला जागे केले आहे. धर्म जिवंत ठेवण्यासाठी धार्मिक लोकांची आज गरज असल्याचे प्रतिपादन उद्धव महाराज नेवासकर यांनी केले

नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावरील सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आश्रमाचे प्रमुख महंत हभप श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

कार्यक्रमाला त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज, भागवताचार्य किशोर महाराज जाधव, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार, भगवान महाराज डिके, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, गायनाचार्य अशोक महाराज निर्फळ, लतीफ महाराज शेख, ज्ञानेश्वर महाराज हजारे, महेंद्र महाराज शेजूळ, वरद विनायक संस्थान लोणीचे सेवेकरी कचरू नाना निर्मळ, संजय महाराज जगताप, प्रमुख उपस्थित होते

यावेळी बोलताना हभप उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले, “भजन-कीर्तनासारख्या धार्मिक कार्यक्रमांतून परस्पर सामंजस्य निर्माण होते. यामुळे कौटुंबिक व सामाजिक आरोग्य अबाधित राहते आणि समाज सुखी होतो. अंतःकरणाच्या शांतीसाठी परमार्थ आवश्यक आहे. संकटांवर मात करण्यासाठी परमार्थ हा मार्ग आहे; धैर्य, सामर्थ्य, शहाणपण हे परमार्थातूनच मिळते.”

संतांचे कार्य स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “संतांकडून समाजाला आत्मस्वरूपाचा बोध मिळतो. आपल्या सुखासाठी संतांचे उपकार मोठे आहेत. अज्ञानाच्या झोपेतून संतांनी विचारांच्या माध्यमातून आपल्याला जागे केले आहे. धर्म जिवंत ठेवण्यासाठी धार्मिक लोकांची आज गरज आहे.”

कार्यक्रमाच्या सांगतेनंतर हभप उद्धवजी महाराज मंडलिक यांनी भाविक, आणि दाते यांचे मनःपूर्वक आभार मानले व सन्मान केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब झिने सर यांनी केले. सर्व भाविकांना सुरेगाव येथील नामदेवराव शिंदे सर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी बाबा महाराज मोरे, भारत महाराज धावणे, बाळासाहेब निगळ, मृदुंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, कृष्णा महाराज हारदे, शंकरराव लोखंडे, नंदकुमार पाटील, इंजिनियर सुनीलराव वाघ, नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के, पी.आर. जाधव, वैभव शेटे, निलेश गोडसे यांच्यासह पंचक्रोशीतील व अहिल्यानगर, संभाजीनगर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट—  अधर्मीयांनाही नियती उत्तर देतेच

परिस्थितीने घडणाऱ्या घटना नियतीने ठरवल्या असतात.या परिस्थितीत देश जिंकण्यासाठी माणसामाणसात देशभक्तीची भावना जागवली पाहिजे.”

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
25 ° C
25 °
25 °
87 %
4kmh
100 %
Sat
25 °
Sun
26 °
Mon
28 °
Tue
27 °
Wed
29 °

Most Popular

error: Content is protected !!