जिल्ह्याला १५९ कोटी; खरीप हंगामाला होणार फायदा
पाचेगाव( रमेश शिंदे)
सहा महिन्यांपासून मागील खरीप हंगामातील पीकविमा नुकसान भरपाईच्या बहूप्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १ कोटी ८४ लक्ष २८० शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई मदत मिळाली असून जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत असून यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला या मदतीने आणखी चालना मिळाली आहे.
पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून गेल्या हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना २ हजार ५५२ कोटी ६० लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी ७१२ कोटी ७५ लाख रुपये, असे एकूण ३ हजार २६५ कोटी ३६ लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले होते.त्यापैकी पुणे विभागाला २८३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
त्यानुसार या २८३ कोटींपैकी अहिल्यानगर जिल्ह्याला १५९ कोटी २१ लक्ष ५४ हजार ४२४ रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात नेवासा तालुक्यातील ३१ हजार ०४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानीपोटी ४४ हजार २४३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४६ कोटी ५२ लक्ष २१ हजार ३३८ रुपये मंजूर झाले होते. यातील नव्वद टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांचीही रक्कम लवकरच जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या ३ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानीपोटी ६ हजार ७५७ शेतकऱ्यांना १ कोटी ६२ लक्ष २७ हजार ५८४ रुपयाची नुकसान भरपाई मिळाली आहे.त्या व्यतिरिक्तही स्थानिक नैसर्गिक आपत्तीतूनही वरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळालेली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक लाभ हा नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला असून येणाऱ्या पुढील खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या खते, बी-बियाणेसाठी या रकमेचा मोठा हातभार लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना ४६ कोटी पेक्षा अधिक रकमेची पीकविमा नुकसान भरपाई मिळाली असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल.
---धनंजय हिरवे, (तालुका कृषी अधिकारी
नेवासा तालुका शेतकरी/अर्ज.. क्षेत्र/हे… रक्कम कोटीत
जामखेड ९०२४ ४४७९ ७ कोटी ०४ लक्ष ७६०५८
कर्जत २७८८ १४८३ १ कोटी ४१ लक्ष ८९०३३
पारनेर १६२५ ९६१ ८० लक्ष ३५३२३
पाथर्डी ३२८२४ १४०६३ १३ कोटी ६९ लक्ष ४०२७२
श्रीगोंदा ९२५४ ५६६५ ६ कोटी २६ लक्ष ५५४३९
अकोले ९०० ५६४ ७७ लक्ष ०१६१६
कोपरगाव ९५३९ ७८५८ १० कोटी ६२ लक्ष ८०३१३
नगर ४४४१ ३३८३ ४ कोटी ४७ लक्ष ४१५७६
नेवासा ४४२४३ ३१०४४ ४६ कोटी ५२ लक्ष २१३३८
राहाता ४६७० ३९५० ७ कोटी १३ लक्ष ५६९०८
राहुरी १५१०८ १०५०७ १७ कोटी ०४ लक्ष १२६९१
संगमनेर १७३३ १००६ १ कोटी ८१ लक्ष ७५२२२
शेवगाव ३८१०० २३७९७ ३१ कोटी ५३ लक्ष ७८७७०
श्रीरामपूर १००३१ ८११८ १० कोटी ०५ लक्ष ८९८६४
एकूण १८४२८० ११६८७९ १५९ कोटी २१ लक्ष ५४४२४
अवकाळी पाऊस आणि आपत्ती चे विमा संरक्षण आल