spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा तालुक्यातील तीर्थस्थळांना राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी रस्ता निधी द्या- आमदार विठ्ठलराव लंघे

नेवासा तालुक्यातील तीर्थस्थळांना राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी रस्ता निधी द्या- आमदार विठ्ठलराव लंघे

नेवासा( प्रतिनिधी )

संतांची भूमी आणि श्रद्धेचा गाभा असलेल्या नेवासाला देशाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करायचं असेल, तर त्याला दर्जेदार रस्ते हवेच!” अशा शब्दांत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे ठोस निधीची मागणी केली.

नेवासा तालुक्यातील मराठी भाषेत उगमस्थान असलेले संत ज्ञानेश्वर मंदिर, आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त शनिशिंगणापूर, भू मंडळावरील अत्यंत देखणे देवस्थान देवगड व जगभरातील मातंग समाजाचे एकमेव असलेले वरखेड महालक्ष्मी मंदिर या तीर्थस्थळांकडे दरवर्षी लाखो भाविकांचा ओघ असतो. मात्र, या मार्गांची दुरवस्था आणि अपुरं रस्ताजाळं भाविकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे

या नेवासा तालुक्याच्या धर्मनगरीचा धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक ठसा देशभर उमटावा, यासाठी केंद्र सरकारच्या रस्तानिधी योजनेंतर्गत विशेष निधी द्या,” असे निवेदन लंघे-पाटील यांनी ना. गडकरी यांना सादर केले. आणि जगाच्या नकाशावर नेवासा तालुका तीर्थक्षेत्रांचा तालुका म्हणून अधोरेखित होण्यासाठी रस्ते विकास गरजेचे असल्याचे लंघे यांनी सांगितले

या मागणीला केंद्र सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी आशा नेवासातील भाविकांसह स्थानिक नागरीक व्यक्त करत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
74 %
7.3kmh
100 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!