spot_img
spot_img
HomeUncategorizedइमामपुरात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यूदुसरा किरकोळ जखमी; सोमवारी सायंकाळी घडली घटना

इमामपुरात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यूदुसरा किरकोळ जखमी; सोमवारी सायंकाळी घडली घटना

पाचेगाव – {रमेश शिंदे याच कडून}

: इमामपूर(ता.नेवासा) येथे अंगावर वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि.१२ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.
गणेश शिवाजी काळे(अंदाजे वय-३२) असे त्या अंगावर वीज कोसळून मयत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मयत गणेश आणि परिसरातील आणखी सहा सात शेतकरी तसेच नादुरुस्त रोहित्रावरील काम करणारे पाच सहा कामगार हे सर्व शेतातील नादुरुस्त असलेल्या रोहित्राचे राहिलेले उर्वरित काम आटोपून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास आकाशात मोठी वीज कडाडली. ती वीज मयत गणेश काळे याच्या अंगावर कोसळली. त्याला उपचारार्थ नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.
या घटनेत कामगार असलेल्या आणखी एकास किरकोळ वीजेचा धक्का बसला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मयत गणेशच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार बहिणी असा परिवार आहे.या आकस्मिक धक्क्याने इमामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
74 %
7.3kmh
100 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!