spot_img
spot_img
Homeआरोग्यअवकाळी पावसाचे संकट,ढगाळ हवामानामुळे माळव धोक्यात

अवकाळी पावसाचे संकट,ढगाळ हवामानामुळे माळव धोक्यात

निंभारी(वार्ताहर), { किरण जाधव याज कडून }अवकाळी पावसाचे संकट, नेवासा श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील शेतकरी चिंतेत. ढगाळ हवामानामुळे माळव मिरची टोमॅटो पिकांवर रोगराई उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत

जिल्ह्यासह नेवासा राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे ढगाळ हवामान व हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला व फळ पिकांवर रोगराईने डोके वर काढले आहे विशेषता माळव मिरची व टोमॅटो यांसारख्या कोवळ्या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.

पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने बुरशीसाठी पोषक वातावरण निर्माण झाली आहे परिणामी अनेक ठिकाणी पिकांवर काळे डाग कुज आणि फळगळ यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे अनुभव नेवासा तालुक्यातील शेतकरी रामभाऊ अर्जुन जाधव यांनी सांगितले मिरचीवर डाग पडू लागली आहेत उत्पादन घटण्याची शक्यता दिसते. राहुरी तालुक्यातील शेतकरी नवनाथ रघुनाथ पवार म्हणाले माळवावर बुरशीची प्रादुर्भाव वाढत आहे फवारण्या करूनही फारसा उपयोग होत नाही.

प्रगतशील शेतकरी हरिभाऊ दत्तात्रय चोरमले यांनी सांगितले टोमॅटोची फळ काळसर होत असून कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन, कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य बुरशीनाशकाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे

विभागाच्या माहितीनुसार हवामान लक्षात घेता शेतकऱ्यांनी फवारणीची वेळ व औषधाची मात्रा काळजी पूर्वक ठरवावी रोग नियंत्रणासाठी सतत निरीक्षण गरजेचे आहे. शेतकऱ्यांची मागणी, अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि भरपाई जाहीर करावी अशी मागणी तिन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
82 %
3.8kmh
100 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
28 °

Most Popular

error: Content is protected !!