spot_img
spot_img
HomeUncategorizedखंडोबाच्या सासुरवाडीत जन्मलेल्या कन्येचं वैद्यकीय क्षेत्रात झेपावलेलं स्वप्न पूर्ण!

खंडोबाच्या सासुरवाडीत जन्मलेल्या कन्येचं वैद्यकीय क्षेत्रात झेपावलेलं स्वप्न पूर्ण!

नेवासा बुद्रुक प्रतिनिधी संभाजी ठाणगे याज कडून

नेवासा बुद्रुक – एक साधं खेडं, पण श्रद्धेने ओतप्रोत भरलेलं. इथेच पुरातन खंडोबा-म्हाळसा, बाणाई मंदिराच्या पायथ्याशी एक कन्या मोठी झाली – डॉ. रुचिता बेद्रे. तिचं स्वप्न मोठं होतं – डॉक्टर बनायचं. पण स्वप्नाच्या वाटा नेहमीच सोप्या नसतात.

घरात साधं वातावरण, मर्यादित साधनं, पण आई-वडिलांची साथ आणि आपल्या कष्टांवर नितांत विश्वास असलेली रुचिता. दिवसरात्र अभ्यास, अडचणींचा डोंगर, पण ती डगमगली नाही. अखेर एमबीबीएस परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करत तिने आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा अभिमान उंचावला.

या यशाच्या क्षणी तिला शुभेच्छा देण्यासाठी खंडोबा-म्हाळसा मंदिरात तिचा सन्मान करण्यात आला. देवस्थानचे प्रमुख संभाजीराव ठाणगे भावूक होत म्हणाले, “नेवासा बुद्रुक ही खंडोबाची सासुरवाडी आहे. इथे जन्मलेल्या प्रत्येक कन्येमध्ये आम्ही म्हाळसादेवीचं रूप पाहतो. रुचितासारख्या कन्यांचा यशस्वी प्रवास म्हणजेच आमच्यासाठी देवाचा आशीर्वाद.”

या सत्कार सोहळ्यात रुचिता हिच्या डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू सगळ्यांनाच भावूक करून गेले. “माझं यश हे माझ्या आई-वडिलांच्या त्यागाचं फलित आहे,” असं सांगताना तिचा स्वर नकळत थरथरत होता.

आज ही कन्या केवळ डॉक्टर नाही, तर आपल्या जिद्दीच्या आणि श्रद्धेच्या बळावर संपूर्ण गावासाठी एक प्रेरणा बनली यावेळी डॉ. रुचिता हिचे वडील राजेंद्र बेद्रे, आई सुवर्णा बेद्रे, आत्या भारती बेद्रे, देवस्थान प्रमुख संभाजी ठाणगे, प्रकाश उंडे, राजेंद्र काशीद, बालू फसले, कचरू काळे, शांताराम बोर्डे, पुजारी प्रसाद भराट उपस्थित होते

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
42.9 ° C
42.9 °
42.9 °
19 %
4.5kmh
100 %
Thu
43 °
Fri
39 °
Sat
38 °
Sun
36 °
Mon
36 °

Most Popular

error: Content is protected !!