spot_img
spot_img
HomeUncategorizedनेवासा शहरात तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा शहरात तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा {आदिनाथ पटारे याज कडून}

शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
“भारत माता की जय”वंदे मातरम च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती
श्री मळगंगा देवी पासून ढोल ताशांच्या गजरात तिरंगा शौर्य यात्रा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. भारत माता की जय,वंदे मातरम चा जयघोष करत वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक ढोल पथक तसेच भारत माता,अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांची बालगोपाळांनी केलेली वेशभूषा मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते
तिरंगा शौर्य यात्रा मिरवणुकीत हातात तिरंगा झेंडे घेऊन महिला,युवती,युवक,नागरिक सहभागी झाले होते यावेळी तलवारबाजी,शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. नेवासकरांच्या वतीने तिरंगा शौर्य यात्रा मिरवणुकीचे तोफांची सलामी देत नेवासा शहरातील चौकाचौकात स्वागत करण्यात आले.
सदर रॅलीच्या समारोप प्रसंगी पेहलगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पारंपारिक सौदामिनी च्या पथकातील वादयांनी नेवासा शहर परिसर दुमदुमला होता
तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूक प्रसंगी नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रताप राजे चिंधे पाटील,भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ अमृता नळकांडे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कोलते,श्रीकांत नळकांडे, शाम मापारी यांच्यासह नेवासकर नागरिक महिला युवती युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
27 ° C
27 °
27 °
74 %
7.3kmh
100 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
28 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

error: Content is protected !!