spot_img
spot_img
HomeUncategorizedसाईराम पाटील बानकर यांचा सत्कार

साईराम पाटील बानकर यांचा सत्कार

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था .१मे २०२४महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस पाटील राज्यपाल पुरस्कार विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार प्राप्त तसेच श्री शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त श्री.साईराम पाटील बानकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजनाताई बेल्हेकर, श्री शनेश्वर उद्योग समुहाचे श्री.बाळासाहेब पाटील बानकर, लांडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी हरीभाऊ पाटील लांडे, संदीप भाऊ बेल्हेकर,संचालक अभिषेक दादा बेल्हेकर यांच्या उपस्थित सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी बी.सी.ए. कॉलेजचे प्राचार्य रोहन कांडेकर, पॉली टेकनिककॉलेजचे प्राचार्य हेमंत आहिरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुरबटमट सर, पी.व्ही.बेल्हेकर आयुर्वेद कॉलेज चे प्राचार्य डॉ.भालसिंग,संस्थेचे ऑफिस सुप्रीटेंडत शिवनारायन वाघे ,ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. गणेश डांगे,ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य काकासाहेब वाल्हेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य वैभव जाधव, शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वाघे, एम.बी.ए.कॉलेजचे श्री.अजित तांबे,श्री.मनोज माने, तसेच विभाग प्रमुख अमोल विघे, संगीता हापसे, नानासाहेब गायकवाड, तसेच सर्व कॉलेजचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेशराव बेल्हेकर यांच्या हस्ते पोलिस पाटील राज्यपाल पुरस्काराचे मानकरी श्री.साईराम पाटील बानकर यांचा शाल नारळ व पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पोलिस पाटील राज्यपाल पुरस्कार श्री.साईराम पाटील बानकर यांनी आपल्या विचारातून सर्वांना मंत्र मुग्ध केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर यांनी आपल्या भाषणातून एक सुसंस्कृत व्यक्ती ते पोलिस पाटील कसा असावा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या कडून पुरस्कार मिळावा ही आपल्या नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमासाठी मयुरी निपुंगे, रमेश राठोड, गणेश अंबाडे, योगेश मनाळ, तुकाराम खाटीक, महेश फडतळे, दत्ता पाटील,बापूसाहेब नवथर,, शुभांगी पंडित, तसेच सर्व कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचरी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा. अमोल विघे यांनी केले.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
34.1 ° C
34.1 °
34.1 °
46 %
7.9kmh
30 %
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!