गैरहिंदू मुस्लिम लोकांकडून शनीच्या मुख्य चौथर्यावर केले होते सुशोभीकरणाच्या काम
नेवासा प्रतिनिधी
अहिल्या नगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये विश्वस्त मंडळाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी काही गैरहिंदू मुस्लिम लोकांकडून शनीच्या मुख्य चौथर्यावर सुशोभीकरणाच्या काम करण्यात आले त्यामुळे नेवासा तालुक्यातील काही हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचा प्रकार घडला हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्ववादी नागरिकांनी या गोष्टीचा जाहीर निषेध केला
. त्याचा अनुषंगाने काल संध्याकाळी ठीक सहा वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून शनी मुख्य शनि मूर्तीचा व चौथर्याचा दूध अभिषेक व गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.
या आंदोलनात शेकडो हिंदू समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी ऋषिकेश शेटे यांनी आपल्या तीव्र भावना विश्वस्त मंडळ विषयी गैरप्रकाराबद्दल मांडल्या. व अशा गैरहिंदू असणाऱ्या लोकांना शनिशिंगणापूर देवस्थान मधून कायमचे हद्दपार नाही केले तर या पुढील काळात मोठे तीव्र स्वरूपाचेआंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदुत्ववादी संघटना व स्थानिक शनी भक्त यांनी दिला आहे.