नेवासा
ग्रामविकास विभागाशी संबंधित वेतन त्रुटी संदर्भात माननीय ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे साहेब यांना वतीने निवेदन दिले.
नेवासा तालुक्याचे आमदार सन्माननीय श्री. विठ्ठलराव लंघे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे आमदार सन्माननीय खताळ साहेब हे यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मुद्द्याला आवश्यक तेवढा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
सदरचे निवेदन देताना पंचायत समिती, नेवासा यांच्यावतीने श्रीमती वांढेकर मॅडम (संघ राज्य कार्यकारणी सदस्य), श्रीमती धनापुणे मॅडम, श्रीमती गजभिव मॅडम आणि श्रीमती ननवरे मॅडम, श्रीम.निशा कदम महिला अध्यक्ष,श्री.समीर आंब्रे राज्य समन्वयक,श्री.भाऊसाहेब आव्हाड यांनी उपस्थिती दर्शवली. विविध विभागांतील महिला कर्मचारी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या निवेदनाचे सादरीकरण संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. जेजुरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी वेतनातील त्रुटींच्या निवारणासाठी शासनाकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
मा. श्री. जयकुमार गोरे साहेब,मंत्री ग्राम विकास विभाग यांनी जून 2025 मध्ये आपणास बैठकीसाठी पाचारण केले जाईल. असे आश्वासन दिले
या उपक्रमामुळे लिपिक सेवक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एक सकारात्मक दिशा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.