तृप्ती देसाई यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नेवासे
– भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्याविरोधात एक संपादित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याचा प्रकार बुधवारी समोर आला. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्या भाचीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील असून, त्यामध्ये छेडछाड करून तो अश्लील असल्याचे भासवले गेले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तो व्हिडिओ पोस्ट करत ही बाब समोर आणली व त्यात भाजप पक्ष भाजपने नेते आणि जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या यांची बदनामी करण्यात आली आहे
मात्र, भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. दिनकर हे बालपणापासून संघाशी जोडले गेले असून, अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहेत. सेवाभाव, समर्पण आणि कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी जिल्हाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. हे यश काही विरोधकांना पचनी पडत नसल्याने, हा पूर्वीच्या घरगुती कार्यक्रमातील व्हिडिओ संपादित करून सोशल मीडियावर फिरवण्यात आला असल्याचा दावा ऋषिकेश शेटे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ स्वतः नितीन दिनकर यांनीच मागील वर्षी 14 मे 24 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून सार्वजनिक केला होता. त्यावेळी ते जिल्हाध्यक्ष नव्हते
तसेच या कार्यक्रमाला श्रीरामपूर शहरातील सर्वपक्षीय नेते व्यापारी नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक उपस्थित होते स्वतःच्या भाचीच्या कार्यक्रमात नातेवाईकांबरोबर दोन मिनिटं नाचण्यास बोलवले होते
तोच व्हिडिओ छेडछाड करीत त्यामुळे तो नव्याने अश्लीलतेचा आरोप करत पसरवणे हा ठरविक षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप भाजपा नेते ऋषिकेश शेटे यांनी केला आहे.
या प्रकारामुळे उत्तर नगर जिल्ह्यात भाजप व महायुती कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे. सोशल मीडियावर तृप्ती देसाई यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून, तृप्ती देसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची जोरदार मागणीही ऋषिकेश शेटे यांनी केली आहे.
चौकट –तृप्ती देसाई यांचे विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल —-सदरची कृती हे मला माझ्या पार्टीला आणि माझ्या नेत्यांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र आहे सदरचा व्हिडिओमध्ये असलेली घटनाही माझ्या भाचीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ ला छेडछाड करून बनवलेला आहे 14 महिन्यापूर्वीचा हा वाढदिवसाच्या व्हिडिओ असून त्यावेळी मी जिल्हाध्यक्ष नव्हतो याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे– नितीन दिनकर भाजपा जिल्हा अध्यक्ष