जगभरातील २५ अग्रगण्य उद्योजकांमध्ये निवड !
नेवासा
अहिल्यानगर जिल्ह्यातील मातीतली माणसं आता थेट लंडनच्या हाऊस ऑफ पार्लमेंटपर्यंत पोहोचू लागली आहेत, आणि याचं जगावेगळं उदाहरण म्हणजे – अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव!
उद्योग व्यवसाय, सहकार, तंत्रज्ञान, वित्त अशा अनेक क्षेत्रांत एकाच वेळी उत्तुंग यश संपादन करणाऱ्या या अभ्यासू अर्थतज्ज्ञाची निवड जगभरातील २५ अग्रगण्य उद्योजकांमध्ये करण्यात आली आहे.
लंडनस्थित ‘ऑर्गनायझेशन ऑफ स्कील डेव्हलपमेंट’ या संस्थेने त्यांना ‘गेस्ट ऑफ ऑनर’ या अत्युच्च सन्मानासाठी आमंत्रित केलं असून, येत्या १६ जुलै रोजी लंडनच्या हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये हा गौरव प्रदान होणार आहे. या सोहळ्यात ते नवउद्योजकांशी संवाद साधून आपला प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगणार आहेत.
विशेष म्हणजे, ही निवड फक्त आर्थिक घोडदौडीपुरती मर्यादित नसून, समाजभान, मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि पारदर्शक व्यवस्थापन यांचा आलेख उंचावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची झाली आहे. म्हणूनच डॉ. भालेराव यांची निवड ही केवळ त्यांच्यासाठी नव्हे, तर नेवासा, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब ठरते.
अर्थतज्ञ डॉ . प्रशांत भालेराव यांनी रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून देशातील ९ राज्यात १३९ शाखा द्वारे आपल्या कार्याचा पाया रोवला . ते रेणुकामाता इंन्फो सोल्युशन्स लिमिटेड, पुणे . , ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड, अहमदनगर .चंद्रकांत मंगल ‘ व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, आणि रेणुकामाता प्रॉडक्शन हाऊस, मुंबई, या संस्थाचे संस्थापक असून अध्यक्षीय धूरा सांभाळत आहेत , रेणुकामाता सिक्युरिटीज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई, ही संस्थाही त्यांचे यश असून या संस्थाच्या माध्यमातून त्यानी अत्यंत पारदर्शी कामकाज करत सातत्याने सामाजिक कार्याचा वसा जपला आहे .म्हणूनच असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, नवी दिल्ली च्या सदस्यपदीही त्यांची दोन महिन्यापूर्वी नियुक्ती झाली आहे . या सर्व बाबीची दखल घेऊन डॉ भालेराव यांची या सर्वोच्च सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे .
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र अमरापूर येथे नियोजित गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असल्याने १० व १२ जुलैच्या लंडन कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नसले, तरी १६ जुलैला सहकुटुंब सन्मान स्वीकारून नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते जाणार आहेत.डॉ.भालेराव,यांच्या या सन्मानाने संपूर्ण महाराष्ट्राचे माथे उंच झाले!.
–