नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे अशी ठोस मागणी
नेवासा
नेहमी संयमी पण अभ्यासू भूमिकेसाठी परिचित असलेले आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात आपल्या सर्जनशील आणि ठाम परफॉर्मन्सने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे अशी ठोस मागणी त्यांनी आरोग्य सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूंकडे लक्ष वेधत जोरदारपणे मांडली.
नेवासा तालुक्याच्या आरोग्यविषयक भविष्याची आशा आता अधिक बळकट झाली आहे — आणि त्या मागे आहे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा ठाम आणि परिणामकारक परफॉर्मन्स.
नेवासा फाटा परिसरात दररोज होणाऱ्या अपघातांचे आकडे आणि त्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे होणारी जीवितहानी — हे वास्तव लंघे यांनी समोर ठेवले. “नेवासा फाटा म्हणजे महामार्गांचे केंद्रबिंदू आहे; मात्र आरोग्य सुविधा मात्र अत्यंत कमकुवत आहेत. हा विरोधाभास थांबला पाहिजे,” असे ते ठासून म्हणाले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी अधिकृत प्रस्ताव सादर केल्याची माहितीही सभागृहात दिली.
संपूर्ण सभागृहात लंघे यांची सादरीकरणाची पद्धत, त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि मुद्द्यांचा अभ्यास पाहता, अनेकांनी त्यांच्या या लोकहिताच्या लढ्याची दखल घेतली. केवळ मागणी करून थांबले नाहीत, तर त्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आणला.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी नेवासा येथे १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय होण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून विशेष प्रयत्न करेन.”— दादासाहेब भुसे, मंत्री
अशा ठिकाणी नको तर रुग्णालय उभारायचे कुठे — आमदार विठ्ठलराव लंघे
सभागृहात दिलेले मुद्दे —–
◆पुणे–संभाजीनगर व बीड–नाशिक महामार्गांचा छेद बिंदू असलेल्या मुकिंदपूर फाट्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ****
◆सतत होणाऱ्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार मिळत नसल्याने वाढलेले मृत्यू प्रमाण****
◆परिसरातील ६० गावे आरोग्यदृष्ट्या या रुग्णालयावर अवलंबून आहेत*****
◆सध्याच्या ग्रामीण रुग्णालयाची अपुरी क्षमता आणि सुविधा****