मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर– “फौजदारी गुन्हे दाखल करणार, देवस्थान साफ केल्याशिवाय मागे हटणार नाही”
**विधानसभेत 22 मिनिट चर्चा**
नेवासा (प्रतिनिधी) –
कोट्यवधी लोकांची श्रद्धा असलेल्या शनीशिंगणापूर देवस्थानात प्रचंड आर्थिक घोटाळा झाला असून, लाखो भाविकांच्या पैशांची उघड उघड लूट झाल्याचा स्फोटक आरोप आमदार विठ्ठलराव लंघे यांनी थेट विधानसभेतच केला. बनावट अॅप्सद्वारे निधी गोळा करून खासगी खात्यांमध्ये वळवणे, हजारोंच्या बनावट नोकर भरती, अस्तित्व नसलेल्या सेवा व कर्मचाऱ्यांचे भानगडी उघड करत लंघे यांनी संपूर्ण सभागृहात नव्हे तर देशभरात खळबळ उडवून दिली.
“जिथे कुठल्याही घराला कडी-कोयंडा लागत नाही, असा हा गाव – आणि त्याच गावात, शनिदेवाच्या साक्षीने करोडोंचा अपहार “ईश्वराच्या घरात भ्रष्टाचाराचा तांडव सुरू आहे… आणि अद्याप एकाही दोषीवर गुन्हा दाखल नाही! ही श्रद्धेची हत्या आहे,” असे लंघे यांनी ठणकावून सांगितले.
बनावट अॅपचा मोठा कट – लाखो भाविकांना १८०० रुपयांचा गंडा!
गेल्या काही वर्षांत बनावट मोबाईल अॅप्स तयार करून शनी उपासक भाविकांकडून सुमारे कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. प्रत्येकी १८०० रुपयांची देणगी आकारली गेली, आणि सुमारे २ लाख भाविकांची नोंदणी या फसवणुकीसाठी वापरण्यात आली. मात्र, ही रक्कम देवस्थानच्या अधिकृत खात्याऐवजी खासगी खात्यांत जमा झाली!
चौकशी अहवालात बोगस नौकर भरती आणि लाखोंचा पगार घोटाळा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या चौकशी अहवालावर भाष्य करत “देवस्थान हे आस्थापन नव्हे, भ्रष्टाचाराचं केंद्र बनलंय!” असे स्पष्ट केले.
अहवालानुसार…
१५ खाटांच्या रुग्णालयात दाखवलेले ८० डॉक्टर – प्रत्यक्षात फक्त ४!
१०९ खोल्यांच्या भक्तनिवासात २०० कर्मचारी दाखवले – कार्यरत केवळ १०
नसलेल्या बागेच्या देखरेखीसाठी ८० कर्मचारी!
तेल काउंटरवर १२ जागा – पण दाखवले ३५२ कर्मचारी!
सुरक्षा विभाग, शेती, वाहनतळ, विद्युत – सगळीकडे बनावट संख्यांची भरती!
कोणतेही मास्टर रोल नाहीत, हजेरी वही नाही, सर्व काही हवे तसे दाखवून देणग्यांचा अपहार आणि लाखोंचा पगार घोटाळा चालू होता.
दोषी विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी नंतर विश्वस्त मंडळ बरखास्त
मुख्यमंत्री फडणवीस यांनी “संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाई निश्चितच होईल,” असे ठामपणे सांगितले.
तसेच २०१८चा “शिंगणापूर कायदा” अंमलात आणण्याचा संकेत देत, “शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे येथेही प्रशासन मंडळ स्थापन करणार,” असेही स्पष्ट केले.
पाचशे कोटी पेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार –आमदार धस
ॲपची संख्या गुणिले सभासद गुणिले अठराशे रुपये असा हिशोब केला तर पाचशे रुपये पेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार झाल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले व या संस्थानांमधील काही विश्वस्त आणि कर्मचारी हे दर महिन्याला कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ता खरेदी करत असल्याचा आरोप केल

शनीशिंगणापूरसारख्या जागतिक धार्मिक स्थळी असा भयानक भ्रष्टाचार उघडकीस आल्याने भाविकांच्या भावना हादरल्या आहेत. शासन दोषींवर कारवाई करावी भाविकांना शनीची कृपा मिळवण्यासाठी आधी या मंदिरातल्या पाप्यांना प्रायश्चित्त आवश्यक आहे! अशी मागणी होत आहे