सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम , पाई चालणाऱ्या भाविकांना जवळचा रस्ता दाखवणारे फलक !
नेवासा,
सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या मार्गदर्शनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील मार्केट यार्ड व परिसरात दिशादर्शक फलक उभारण्यात आले व रस्ता दुरुस्तीची काम देखील करण्यात आले आहेत.
या उपक्रमाद्वारे भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यास अधिक सुलभता निर्माण होणार आहे. सदर दिशादर्शक फलक व रस्ता दुरुस्तीचे काम नेवासा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक पाटील यांचे मार्गदर्शना खाली शाखा अभियंता बी. टी. सोनवणे साहेब उपअभियंता अनंतराव सोलट साहेब यांनी स्वतः उभे राहून करून घेतले
या कार्याबद्दल संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, नेवासा व भाविक भक्तांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच या अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
चौकट—-
” कामिका एकादशीच्या निमित्ताने मंदिरात होणाऱ्या भक्तीमय कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, हा उपक्रम भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
-पांडुरंग अभंग, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर संस्था नेवासा.