परशुराम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
नेवासा –
कामिका एकादशीच्या औचित्याने श्री परशुराम प्रतिष्ठान, नेवासा व उदयकुमार बल्लाळ यांच्या वतीने ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या सर्व निवासी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टेबल वाटप करण्यात आले.
या उपक्रमात आज सकाळी मंदिरामध्ये ह.भ.प. श्री देविदास महाराज म्हस्के, ज्ञानेश्वर मंदिर संस्थान नेवासा व श्री उदयकुमार बल्लाळ साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टेबल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास श्री परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद देशपांडे, सौ सुरेखाताई बल्लाळ, वास्तु विशारद भास्करराव शिंदे संजय देशपांडे, जयंत देवचक्के गौरव देशपांडे गिरीश काका देशपांडे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी बोलताना जयंत देवचक्के व अध्यक्ष प्रमोद देशपांडे यांनी सांगितले की, “ज्ञानेश्वर मंदिरातील निवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी मोहिनीराज मंदिर संस्थान व परशुराम प्रतिष्ठान दरवर्षी सर्वतोपरी मदत करणार आहे.”

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण होत आहे. देवस्थानच्या वतीने देविदास महाराज मस्के यांनी मोहिनीराज मंदिर संस्थान आणि परशुराम प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे निमित्त आभार व्यक्त केले