नेवासा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी पैस खांबाला टेकून संपूर्ण जगासाठी ज्ञानेश्वरी हा बोधप्रद ग्रंथ नेवासात लिहिला. याच पावन स्थळी सोमवारी (दि. २१ जुलै २०२५) कामिका एकादशी निमित्त लाखो वारकरी दर्शनासाठी दाखल झाले होते. या भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा शुभारंभ ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह.भ.प. देवीदास महाराज म्हस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, देवस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख, मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, नगरसेवक अंबादास इरले, जितेंद्र कु-हे, रणजित सोनवणे, कैलास जाधव, रंगनाथ जंगले, निलेश पाटील, बाळासाहेब बनकर, संजय थोरात, आशिष कावरे, गणेश कोरेकर, नारायण लोखंडे, बाबासाहेब मोरे, राजेंद्र सानप, कैलास काळे, मच्छिंद्र कडू, राजू कडू, अनिल परभणे, पिंटू परदेशी, प्रशांत डावखर, भानाभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर आहेर आदींच्या उपस्थितीत झाला.
फराळ वाटपात शंकरराव गडाख मित्रमंडळातील कार्यकर्ते व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.