लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेचा सलग बावीस वर्षाचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती
नेवासा (प्रतिनिधी) –
धार्मिक आणि सामाजिक परंपरा जपणाऱ्या नेवासात कामिका एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्था या सेवाभावी संस्थेच्या वतीने केळी व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमामध्ये भाविकांच्या सेवेसाठी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये व्हॉइस चेअरमन महंमदभाई शेख, पंचायत समितीचे सभापती किशोरभाऊ जोजार, मुकिंदपूरचे सरपंच दादासाहेब निपुंगे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, मुळा कारखान्याचे संचालक नारायणराव लोखंडे, कृष्णा डहाळे, विजुभाऊ कावरे, नगरसेवक अंबादास इरले यांचा समावेश होता.
तसेच मा. ग्रामपंचायत सदस्य मिलिंद नागे, अरुण नजन, पत्रकार विजू शेठ गांधी, डॉ. भाऊसाहेब घुले, बजरंग शेठ इरले, मच्छिंद्र जामदार, कैलास बोरुडे, राम कदम, अण्णासाहेब जाधव, ॲड. अभिजीत पाटील, मॅनेजर लक्ष्मण नाबदे, अंकुश धनक तसेच पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
भाविक भक्तांची सुविधा व त्यांची सेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही पतसंस्थेने हा उपक्रम राबवला. भर उन्हात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांना शीतल पाण्याची व केळीची दिली गेलेली सेवा ही केवळ मदतीपुरती मर्यादित नसून, ती श्रद्धेने केलेली सेवा असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे धार्मिक वातावरणात सामाजिक भान जपले गेले असून, नेवासा परिसरात पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे व कार्यकर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.