अनेक मान्यवरांनी प्रसाद वाटपात घेतला सक्रिय सहभाग!
नेवासा (प्रतिनिधी) –
कामिका एकादशीच्या निमित्ताने पंचगंगा सीड्स आणि पंचगंगा शुगरचे चेअरमन प्रभाकरराव शिंदे यांच्या पुढाकाराने सलग अकराव्या वर्षी खजूर आणि साबुदाणा खिचडी वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. यावर्षी देखील 100 क्विंटल पेक्षा जास्त साबुदाणा खिचडीतसेच खजूराचाही हजारो वारकरी भाविकांनी लाभ घेतला
ज्ञानेश्वर मंदिर परिसरात गेली 11 वर्ष पंचगंगा उद्योग समूहाचे तर्फे खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते व भाविक वारकरी देखील मोठ्या भक्ती भावाने या प्रसादाचा लाभ घेतात

या उपक्रमाला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी पाक शाळेला भेट देऊन आशीर्वाद दिले तर प्रकाशानंदगिरी महाराज, ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले ,अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मंडल प्रमुख प्रताप चिंधे, मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे, किशोर गारुळे साहेब, सतीश कर्डीले, शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब पवार आणि सुभाष पवार यांनी भेट देऊन प्रसाद वाटपात सक्रिय सहभाग घेतला.

उपक्रमाचे संयोजन प्रभाकर काका शिंदे यांच्यासोबत बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, विवेक शिंदे आणि प्रबोध शिंदे यांनी केले. सुमारे १६० कर्मचारी व स्वयंसेवकांनी दोन दिवस अखंड सेवा देत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.
—