100पेक्षा जास्त दिंड्यांना प्रसाद वाटप !
नेवासा, प्रतिनिधी
कामिका एकादशी निमित्ताने गेली २१ वर्षे अखंड सुरू असलेली नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने आयोजित खिचडी प्रसाद वाटप सेवा यंदाही नेवासा फाटा मार्गे शहरात येणाऱ्या सर्व दिंड्यांना मोठा आधार ठरली. पावन गणपतीसमोरील नागेबाबा संस्थेच्या भव्य इमारतीसमोर सकाळी सात वाजेपासून रात्री आठपर्यंत सलग साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यंदा तब्बल १०० हून अधिक दिंड्यांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
या सेवेसाठी स्वतः संस्थापक चेअरमन कडू भाऊ काळे यांच्यासह जनरल मॅनेजर भरत दारुंटे, रिजनल ऑफिसर अक्षय काळे, यशवंत मिसाळ, देविदास कदम, आशिष शिंदे, गणेश वायकर, एकनाथ नांदे, स्वप्निल गाडेकर व अन्य कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेतला. दिंड्यांना केवळ प्रसादच नव्हे तर विसाव्यासाठी आग्रहपूर्वक थांबवून सेवा देत होते
यावेळी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील तसेच खंडेश्वरी देवस्थानचे गणेश नंदगिरी महाराज यांनी भेट देत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.