spot_img
spot_img
HomeUncategorizedएक कोटी पंचावन्न लाखांच्या खंडणी प्रकरणात धक्कादायक खुलासा

एक कोटी पंचावन्न लाखांच्या खंडणी प्रकरणात धक्कादायक खुलासा

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकसह तीन पोलीस कर्मचारी निलंबित



सोनई (वार्ताहर) * अशोक भुसारी याज कडून*

– गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांकडूनच १ कोटी ५० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असून, स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने ‘चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून’ अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७३/२०२५, बी.एन.एस. कलम ३१८(२), ३१८(४), ३१६(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणाचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

तपासादरम्यान आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (रा. शिर्डी) याने पोलीसांकडून घेतलेल्या खंडणीबाबत गंभीर आरोप केला. त्यानुसार, १५ जानेवारी रोजी फॉर्च्युनर गाडीने जात असताना लोणीजवळ पोसई तुषार धाकराव व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी त्याला अडवून “तुझ्याकडे आरबीआय परवाना नसताना जनतेकडून पैसे घेतल्याने तुझ्यावर गुन्हा दाखल करतो,” अशी धमकी दिली.

सावळे याने विनंती केली की त्याने कोणाचीही फसवणूक केलेली नाही, मात्र त्याला विनाकारण गुन्ह्यात अडकवले जाणार असल्याने त्याच्याकडून ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली.

या प्रकरणातील तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्यात आली असता पोसई तुषार छबुराव धाकराव, तसेच पोलीस अंमलदार –

  1. पो.हे.कॉ. मनोहर गोसावी (क्र. २१४५)
  2. पो.हे.कॉ. बापूसाहेब फोलाणे (क्र. ४८६)
  3. पो.हे.कॉ. गणेश भिंगारदे (क्र. १२९३)
    यांच्याविरुद्ध गंभीर अनियमिततेचे पुरावे आढळले.

याअनुषंगाने २१ जुलै रोजी संबंधित चारही पोलिसांना शासन सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, सामान्य गुन्हेगार नव्हे तर पोलीसच आरोपी ठरल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
82 %
3.8kmh
100 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
28 °

Most Popular

error: Content is protected !!