spot_img
spot_img
HomeUncategorizedगोरक्षकांच्या दहशतीने जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्री मंदावली.

गोरक्षकांच्या दहशतीने जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्री मंदावली.

वाहतुक परवाने द्या, वैद्यकिय दाखले द्या, जनावरांच्या पावत्या बरोबरच वाहतुकीसाठी बाजार समितीने दाखले द्यावेत,कत्तल खाण्याला परवानगी द्यावी– व्यापाऱ्यांची मागणी


घोडेगाव -दिलीप शिंदे याज कडून

येथील जनावरांच्या बाजारात जनावरांची वाहतुक करणा-या गाड्या तथाकथीत गोरक्षक व हिदुत्ववादी संघटना अडवतात.


गोवंशहत्या बंदीचा धाक दाखवुन लुटमार करतात.
गाड्या फोडतात,पैशाची मागणी करतात, मालक चालकाला मारहाण करतात,जनावरे खरेदी पावत्या फाडुन टाकतात.यामुळे जनावरांची खरेदी विक्री , वाहतूक करणे अवघड आणखी जोखमीचे झाले आहे .


अहिल्या नगर जिल्ह्यातील शेंडी बाय पास, सोलापूर बाय पास नागापुर एम आय डी सी, कल्याण बायपास येथे हिंदुत्ववादी संघटने कडुन गोवंश हत्या बंदीचा धाक दाखवुन वरिला प्रकार होत आहेत सदर व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे अहिल्या नगर कुरेशी समाज व व्यापारी वर्गाने घोडेगाव उप बाजार आवारात सोनई पो स्टेशन चे ए पी आय विजय माळी व कृ उ बा समिती नेवासा चे सचिव देवदत्त पालवे यांना निवेदन देऊन केली

.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ,पशुसंवर्धन विभाग,पोलिस आयुक्त, जिल्हा पो अधिक्षक यांना पाठविल्यास आहेत.
सदर निवेदन देण्यासाठी,अशोक एळवंडे, शाम कदम, माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, रावसाहेब येळवंडे,राजेश रेपाळे,वसंत सोनवणे,पांडु चौधरी,नाना गि-हे, पोपट ठोंबरे, रवि बर्डे अजीम शेख, अकिल शेख, रशिद शेख,सईद शेख, अयाज शेख, सत्तार शेख, अनिस शेख, सुत्तार शेख, बाबु सय्यद,कासीम शेख, सह व्यापारी वर्ग उपस्थीत होता.
वाहतुक परवाने द्या, वैद्यकिय दाखले द्या, जनावरांच्या पावत्या बरोबरच वाहतुकीसाठी बाजार समितीने दाखले द्यावेत,कत्तल खाण्याला परवानगी द्यावी अश्या विविध विषयांवर व्यापा-यांनी यावेळी चर्चा केली.


व्यापा-यांनी नियमानुसार वाहतुक परवाना असलेल्या वाहनातून जनावरांची वाहतुक करावी. वैद्यकिय दाखला घ्यावा, जनावरांच्या खरेदिच्या पावत्या घ्याव्यात. नियमा नुसार वागल्यास अडचणी येणार नाहित. गोवंश म्हणजे फक्त गायीचं नव्हे तर म्हशी हि गोवंश कायद्यामध्ये येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले.व्यापारी ,वाहतुकदार बनावट वाहतुक परवाने वापरत असल्याचेही सोनई पो स्टेशन चे ए पी आय विजय माळी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.
दुभत्या म्हशी हि अडवल्या जातात. नाहक त्रास दिला जातो.आमची गो शाळा आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत निदान दुभती , गाभण जनावरे तरी पाहा त्यांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या या विपरित परिस्थिती मुळे शेतकरी जनावरांचा बाजार संकटात आला असे व्यापारी वसंत सोनवणे म्हणाले.


व्यापारी असोसिएशनचे अशोक एळवडे यांनी भाकड जनावरांचे करायचे काय? त्यांना चार हजार रु टनाचा ऊस कसा ठरला द्यायचा. भाकड जनावरे शिकुन गाभण दुभती जनावरामुळे शेतकरी पशुपालक यांचे कुटुंब चालते.पण गोवंश हत्या कायद्या मुळे परिस्थिती अवघड झाली आहे अशी खंत व्यक्त केली.


बाजार समिती सचिव देवदत्त पालवे यांनी बाजार समिती नियमानुसार सर्वांना सहकार्य करेल .सध्याच्या परिस्थितीत बाजारात जनावरांची आवक कमी झाली असल्याने खरेदी विक्री मंदावली असुन महुसुल घटल्याचे सांगितले. बाजार समिती सोई साठी हेल्पलाईन चालु करेल असे आश्वासन व्यापा-याना दिले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
31.4 ° C
31.4 °
31.4 °
53 %
3.3kmh
95 %
Sat
31 °
Sun
34 °
Mon
33 °
Tue
34 °
Wed
33 °

Most Popular

error: Content is protected !!