अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा – आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, एकूण ८१हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले asun शासनाकडे ७८ हजार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. उर्वरित बँक खाते, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्याचे काम सुरु आहे.
आमदार लंघे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सातत्याने जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सतर्कतेने नेवासा तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सरसकट पंचनामे करण्यात आले. आणि या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी 120 कोटीची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
काही शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे, बँकेच्या त्रुटी, केवायसी किंवा आधार लिंकिंगअभावी थांबले असले तरी लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील, असे आमदार लंघे यांनी स्पष्ट केले. सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते स्वतः सतत प्रशासनाशी संपर्कात आहेत.
यावेळी शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यात २ हेक्टरपर्यंत राज्य शासन आणि १ हेक्टरपर्यंत केंद्र शासनाकडून अनुदान वितरित करण्यात येणार आहे. अनेकांना अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून, ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांनाही लवकरच मिळतील, अशी ग्वाही तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली आहे.
महत्वाचे
बँक खात्याच्या त्रुटी, आधार कार्ड लिंक नसणे इत्यादी कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीमुळे डाटा अपलोड करताना अडचणी येत होत्या. त्याही अडचणी दूर करून डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

