नेवासा
‘जिनेश्वरी’ हा सर्व सर्वधर्मसमभावाचा आणि सद्विचार प्रसाराचा संदेश देणारा भावार्थ गुरुवर्य आचार्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या जिनेश्वरी ग्रुप च्या माध्यमातून दिलेला आहे
भाऊबीजेच्या निमित्ताने नेवासा शहरात सकल जैन समाजाच्या महिलांच्या जीनेश्वरी ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेल्या पहाटेच्या जिनेश्वरी भव्य धार्मिक मिरवणुकीतून जैनांचा विचारांच्या प्रचाराचा ठसा उमटला.
खोलेश्वर गणपती मंदिरापासून जैन स्थानकापर्यंत निघालेल्या या रॅलीत सकाळी साडेसहा वाजता नेवासातील असंख्य जैन महिला व पुरुष बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला. गुरुवर्य आचार्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. विठ्ठलराव लंघे यांच्या सौभाग्यवती सौ. रत्नमाला ताई लंघे यांनी उपस्थित राहून जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की — “जैन धर्म हा केवळ एक धर्म नाही, तर ती जीवनाला योग्य दिशा देणारी संस्कृती आहे. ‘जिनेश्वरी’ च्या माध्यमातून सर्व समाजाला चांगले विचार, सद्गुण आणि मन:शांतीचा संदेश मिळतो.
या वेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष औस्तवाल, मोहनलाल चोरडिया, मोहनलाल मुनोत, सुभाष कडू, सूर्यकांत गांधी, अभिजीत गांधी, विजयकुमार गांधी, सुनिल शिंगवी, जयकुमार गुगळे, अभय बलाई, संतोष शिंगी, विजय चोरडिया, विशाल व निखिल शिंगवी, कमलेश ओस्टवाल यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमात भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव अमृता ताई नळकांडे, भाजप वैद्यकीय आघाडीच्या डॉ. मनीषा वाघ, तसेच सौ साधनां मुळे आणि सतीश आबा मुळे यांचीही उपस्थिती होती.
–

