सैनिक, माजी सैनिक व पोलीस बांधवांच्या सन्मानाचा अभिनव उपक्रमाचे नववे वर्ष
नेवासा (प्रतिनिधी) :
दिवाळीचा उजेड फक्त घरात नव्हे, तर मनात आणि समाजातही प्रज्वलित व्हावा, यासाठी नेवासा शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकातील झेंडावंदन पटांगणावर “एक पणती जवानांसाठी” हा अनोखा उपक्रम पार पडला. अॅड. अक्षय मोहिते यांच्या संकल्पनेतून आझाद हिंद मित्र मंडळातर्फे सलग नवव्या वर्षी हा कार्यक्रम झाला.
हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन दीपप्रज्वलन करून शहीद जवानांना अभिवादन केले. भारतमातेच्या प्रतिमेसमोर लावलेली प्रत्येक पणती ही एका सैनिकाच्या त्यागाची, एका आईच्या आशीर्वादाची आणि एका राष्ट्राच्या एकतेची प्रतीक ठरली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड. अक्षय मोहिते म्हणाले, “आज लढाई केवळ सीमेवर नाही, तर समाजातील अंधाराशी आहे. जोपर्यंत माणसात माणुसकी, एकता आणि जागृती निर्माण होत नाही, तोपर्यंत भारतात खरी दिवाळी उजाडणार नाही.”
स्वातंत्र्योत्तर काळात या ऐतिहासिक झेंडावंदन पटांगणात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा होत असत. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, काकासाहेब गाडगीळ, साने गुरुजी, पत्री सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील अशा नेत्यांच्या सभा येथे झाल्या होत्या.
नेवाशातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी येथे ध्वजस्तंभाची स्थापना करून तिरंगा उभारला व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे येथे आनंदोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून या ठिकाणी २६ जानेवारी व १५ ऑगस्टला ध्वजारोहण केले जाते
कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, मेजर आप्पासाहेब सोनवणे, जगदीश ढगे, अरुण फाटके, ज्ञानेश्वर बर्डे, देविदास कराळे, अरुण इखे, संदीप कराळे आदी जवानांचा तसेच वीरपत्नी सरिता कराळे, कल्पना इखे यांचा सन्मान करण्यात आला. जवानांनी सीमेवरील अनुभव कथन करताना देशभक्तीचा आणि शौर्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाला,उदयकुमार बल्लाळ, डॉ. नितीन करवंदे, डॉ. स्वप्निल बल्लाळ,डॉ.करणसिंह घुले, डॉ. सुजित मोटे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. संजय सुकाळकर, विजय कावरे, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,प्रा. रमेश शिंदे,अॅड.राहुल मुंगसे,अॅड.भैय्या काझी, अॅड. शेखर गव्हाणे,अॅड.महेश जामदार,पत्रकार मकरंद देशपांडे,सतीश गायके,प्रशांत कानडे,अभय मोहिते, रज्जाक शेख, सलीम देशमुख,संदीप मोहिते, अजमत पठाण, शंकर अंबिलवादे,सुभाष मोहिते,असिफ पठाण, रुपेश उपाध्ये,सज्जू पठाण, सागर शिंदे,खाजा मणियार, किरण अंबिलवादे,असिफ देशमुख, प्रमोद देशपांडे, राजेंद्र देशमुख,नितीन सराफ,श्रावण सरकाळे, प्रसाद पाटील, इरफान कुरेशी, वैभव कोंडेजकर, विजय अंबिलवादे, दत्तात्रय जोशी, अनिल बडवे, सतीश उपाध्ये, विठ्ठल लोखंडे, हुसेन शेख, मोहन शिंदे, अल्ताफ आतार, सुभाष घोरपडे, प्रशांत देशमुख,अनिल शिंदे,प्रशांत सुडके, रणजित राजेभोसले,अदिती राजेभोसले,ओम देशपांडे, दीपक निंबाळकर, ज्ञानेश्वर डौले,सचिन धनक, मयूर देवचक्के,विनायक आंबिलवादे,अबू देशमुख,पदु देशमुख,अनिस देशमुख, यश मोहिते, यश उपाध्ये आदी नागरिकांसह महिलांची गर्दी लक्षणीय होती
पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अॅड. अक्षय मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.
.
“

