spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedबाभूळखेडे येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिरात ११० जणांची तपासणी,२३ युवकांचे...

बाभूळखेडे येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शिबिरात ११० जणांची तपासणी,२३ युवकांचे रक्तदान

बाभूळखेडे येथील सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

नेवासा तालुक्यातील बाभूळखेडे येथील सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसेवक सरपंच संघटना,बाभूळखेडे ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी व सकल ग्रामस्थांच्या पुढाकाराने आयोजित मोफत सर्वरोग निदान व रक्तदान व नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात ११० जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर २३ युवकांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले.समाजाच्या सुखासाठी आरोग्य शिबिर व रक्तदानासारखे विधायक उपक्रम गावोगावी राबवावेत असे आवाहन उदयनदादा गडाख पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

      यावेळी झालेल्या मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन युवा नेते उदयनदादा गडाख खडेश्वरी देवस्थानचे महंत श्री गणेशानंदगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज, भानसहिवरा येथील शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी महंत श्री आवेराज महाराज,माऊली आश्रमाचे प्रमुख हभप श्री ज्ञानेश्वर महाराज हजारे,भाकचंद महाराज पाठक,हभप श्री लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे,रामभाऊ औताडे,उत्तमराव निकम,रामकृष्ण पाटील कांगुणे, आत्मदीप हॉस्पिटलचे डॉ.किरण ढगे,युवा उद्योजक शिवाभाऊ पाठक,बदाम महाराज पठाडे,नजीक चिंचोलीचे सरपंच भाकचंद चावरे,भेंडे येथील सरपंच वैभव नवले,पिचडगावचे सरपंच पोपटराव हजारे,पोलीस पाटील अनिल लहारे,भगवानराव शेजुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
           यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व संत महंतांचे संतपूजन मार्गदर्शक साहेबराव औताडे, सरपंच ज्ञानेश्वर औताडे,इंजिनिअर महेश औताडे यांच्या हस्ते करण्यात आले.तर विविध संस्थेच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या कार्याचा गौरव सत्काराद्वारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर व संत मंडळींनी आयोजित मोफत सर्व रोग निदान,नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराच्या उपक्रमाबद्दल आयोजकांना धन्यवाद देत समाजाच्या सुखासाठी असे विधायक उपक्रम प्रत्येक गावोगावी राबवावेत असे आवाहन केले.
   युवा नेते उदयनदादा गडाख पाटील म्हणाले की साधू संतांच्या विचारांचा नेवासा हा तालुका आहे,गावगावच्या सप्ताहात सर्व मंडळी एकत्रित येतात हे तालुक्याचे वैशिष्ट्य आहे, समाजाला व विचाराला धरून हे गाव काम करते याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी हाती घेतलेले कामे ही लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.समाज हितासाठी व त्यांच्या सुखासाठी अशी मोफत आरोग्य शिबीरे गावोगावी झाली पाहिजे तीच खरी समाज सेवा ठरेल असे सांगून त्यांनी सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या पुढाकाराने घेतलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर उपक्रमाचे व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
               यावेळी झालेल्या शिबीर उदघाटन प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे,जनार्धन महाराज औताडे,केशवराव विधाटे,ज्ञानेश्वर विधाटे,आबासाहेब मते,डॉ. गायत्री औताडे,नारायण कडू पाटील,अँड.अशोकराव कर्डक, हिराभाऊ धनवडे,अँड.मनोज हारदे,विनोद हुसळे, हरिभाऊ विधाटे,माजी सरपंच नवनाथ नवले,टिल्लूभाऊ गव्हाणे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शिबीर आयोजक सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
22 %
3kmh
1 %
Sun
26 °
Mon
29 °
Tue
30 °
Wed
31 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!