नेवासा शहराच्या विकासासाठी हे काम म्हणजे केवळ रस्ते नव्हेत, तर जनतेच्या अपेक्षांचा मार्ग खुला करणारा उपक्रम
नेवासा (प्रतिनिधी) — नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले असून उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायत हद्दीतील विविध रस्ते विकासकामांसाठी तब्बल ₹५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निधीमुळे शहराच्या विकासाच्या दिशा व गतीला नवा आयाम प्राप्त होणार आहे.
नेवासा शहरातील व्यापारी पाच कोटी रुपयांच्या निधी नंतर लगेचच या निधीच्या मंजुरीमागे नेवासाचे आमदार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फळ मिळाले असून त्यांच्या दृढनिश्चयी, पारदर्शक आणि जनसंपर्कप्रधान कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदारांनी स्थानिक पातळीवरील समस्यांचा बारकाईने अभ्यास करून संबंधित विभागाकडून मंजुरी मिळवून देण्याचे कार्य नेहमीच प्राधान्याने केले आहे.
विशेष म्हणजे या रस्त्यांमध्ये निवास शहरातील उपनगरासह मध्यवर्ती ठिकाणाचे रस्ते देखील घेण्यात आलेले आहेत प्रभाग क्रमांक ३ — दहातोंडे घर ते संतोष गाढवे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरणासह होणार असून स्थानिक नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण होणार आहे.
ज्ञानेश्वर मंदिर रोड (जुना पालखी मार्ग) ते कहार वस्ती ते गणपती मंदिर भराव या मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण होणार आहे, ज्यामुळे यात्रेकरूंना व स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.
. मधमेश्वर मंदिर ते खडका रोडपर्यंतचा रस्ता — या भागातील रहिवाशांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला रस्ता नव्याने तयार होणार आहे.
प्रभाग क्रमांक ७ — श्रीरामपूर रोड ते आरेकर हॉस्पिटल व तेथून सरकारी धान्यगोडाऊन ते गणपती मंदिरपर्यंत रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे.प्रभाग क्रमांक १ — मामा भांजे गॅरेज ते नगरपंचायत विहीरपर्यंतचा रस्ता नव्याने तयार होणार असून नगरपंचायतीच्या परिसरातील वाहतुकीस सुलभता मिळेल. प्रभाग क्रमांक १७ — रासने घर ते घोरपडे घर ते भालसिंग वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरणासह होणार आहे. चिंचबन रोड ते व्यवहारे वस्ती जिल्हा परिषद शाळेपर्यंतचा रस्ता — विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेला हा रस्ता आता उत्तम स्वरूपात उपलब्ध होईल.
प्रभाग क्रमांक ३ — ननवरे घर ते इनामदार घर ते पारखे घरपर्यंतचा रस्ता नव्याने तयार होणार आहे.
प्रभाग क्रमांक १७ — ललिता गायकवाड घर ते दिलीप कराळे घरपर्यंतचा रस्ता तयार होणार असून स्थानिक नागरिकांचा दळणवळणाचा त्रास कमी होईल.प्रभाग क्रमांक ७ — दीपक शिंदे घर ते राजेंद्र परदेशी घरपर्यंतचा रस्ता बांधकाम.प्रभाग क्रमांक — निखील जोशी घर ते राजेंद्र पानसरे घरपर्यंतचा रस्ता तयार होणार आहे
या सर्व रस्त्यांच्या मंजुरीमुळे नेवासा नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत वाहतूक सुधारेल, शहराचे सौंदर्य वाढेल तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होतील.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व मा. अजित दादा पवार साहेब यांचे नेवासा नागरिकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
नेवासाचे आमदार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन, सक्रिय पाठपुरावा व जनसंपर्कातूनच हा निधी शक्य झाल्याचे सांगत नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

