राष्ट्रवादीचा प्रचार शुभारंभ 23 तारखेला तर इतर पॅनलचा प्रचार शुभारंभ होणार 26 तारखेला
नेवासा
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असली तरी, काही उमेदवारी अर्ज न्यायालयात गेल्यामुळे प्रचाराला गती मिळू शकत नाही
नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवकांच्या 17जागांसाठी तब्बल 63 उमेदवार रिंगणात असून क्रांतिकारी शेतकरी पक्ष, भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार व पाच प्रभागांतील काही उमेदवारांची प्रकरणे न्यायालयात असल्याने आणि चिन्हवाटप 25 तारखेला होणार असल्यामुळे खरा प्रचार सव्वीस तारखेपासूनच सुरू होईल. त्यामुळे उमेदवारांना मिळणारा प्रभावी प्रचारकाल केवळ पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या मुद्यांमुळे शुभारंभाच्या कार्यक्रमांनाही उशीर झाला आहे.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे चिन्हवाटपही 25 तारखेलाच असल्याने त्यांचा प्रचार शुभारंभ सुद्धा 26 तारखेपासूनच होणार आहे. तसेच भाजप-सेना युतीतील काही प्रमुख उमेदवारांचे अर्ज न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यांचाही अधिकृत प्रचार शुभारंभ 26 तारखेला सुरू होईल.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची चिन्हे व बरेचसे नंबर आधीच निश्चित झाल्याने त्यांचा प्रचार सुरळीत सुरू होणार आहे. 23 तारखेला युवा नेते अब्दुलभाई शेख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर मंदिर, तुकाराम महाराज मंदिर आणि मोहिनीराज मंदिरात नारळ फोडून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचारात आघाडी घेणार आहे
चौकट– या सर्वांमध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार सुरू असला तरी देखील लाऊड प्रचार करून प्रचारास गती घेऊ शकत नाही अशी खंत नगराध्यक्ष पदासाठीचे अपक्ष उमेदवार एडवोकेट दिनकर राव घोरपडे यांनी व्यक्त केली

