प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवार चिन्ह झाडू
नेवासा
माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची प्रभाग क्रमांक नऊ माझे घर आहे ते विकसित करण्याची माझी जबाबदारी पार पाडणार आहे- आम आदमी पार्टीच्या सौ अनिता संदीप आलवणे
नेवासा शहरातील पाणीपुरवठ्याची बिकट अवस्था, स्वच्छतेचा बोजवारा आणि तरुणांना खेळासाठी मैदानांचा पूर्ण अभाव या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. दहा-पंधरा दिवसांनी मिळणारे पाणी आणि गल्लीबोळातील अस्वच्छता यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे युवकांसाठी साधे मैदानसुद्धा उपलब्ध नसल्याने क्रीडा संस्कृतीला मोठा फटका बसत आहे. याबाबतटीका करीत संदीप आलवणे यांनी उमेदवार त्यांच्या पत्नी सौ अनिता संदीप आलवणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी जाहीर केलेल्या अनिता संदीप आलवणे यांनी मुलाखतीत शहरातील परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. “पूर्वी निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. लोकांच्या त्रासाची खरी जाणीव करून घेऊनच मी निवडणुकीत उभी राहत आहे,” असे त्या म्हणाल्या.
“ही लढत धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य जनतेची आहे. नागरिकांचा विश्वास आणि साथ मिळाल्यास नेवासा शहरात नियमित पाणीपुरवठा, स्वच्छतेची सुधारणा आणि तरुणांसाठी दर्जेदार मैदान उभारणे हे माझे पहिले काम असेल. प्रभाग नऊचा विकास नक्की घडवून आणेन,” असा निर्धार आलवणे यांनी व्यक्त केला.

