spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवाशात महायुतीकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी; आज भव्य प्रचार रॅली

नेवाशात महायुतीकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी; आज भव्य प्रचार रॅली


नेवासा : नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी प्रचाराचा जोर वाढवण्यात आला असून, नेवासा शहरात आज बुधवारी (दि. १७ डिसेंबर) भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी सौ. रत्नमालाताई लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता नेवासा येथे महा रॅलीचे आयोजन होणार आहे.

या रॅलीत महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नेवासा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील राजकीय वातावरण तापले असून, या रॅलीद्वारे महायुतीकडून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नेवासा शहरातील महिला, युवक आणि सर्वसामान्य मतदारांचा वाढता सहभाग या रॅलीत दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आगामी २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही रॅली मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट करणारी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!