भाजप–सेना युतीचा प्रचार टॉप गिअरमध्ये; प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढला
नेवासा :
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजप–शिवसेना युतीने प्रचाराच्या मैदानात आक्रमक मुसंडी मारली आहे. शिवसेनेचे डॉ. करण घुले नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून, दुसऱ्या टप्प्यात युतीने प्रचाराची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरवली आहे.
आमदारांची सलग दोन दिवसांची पायी प्रचारफेरी
शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सलग दोन दिवस शहरातील सर्व सतरा प्रभागांमध्ये पायी प्रचारफेरी काढत जनतेशी थेट संवाद साधला. घराघरात जाऊन विकासाचा अजेंडा मांडत त्यांनी प्रचारात धार आणली. त्याला आज सकाळी त्यांच्या पत्नी ताई लंघे यांनी काढलेल्या महिलांच्या भव्य रॅलीची ताकद लाभली. संपूर्ण शहरातून गेलेल्या या रॅलीने महिला शक्तीचे प्रभावी दर्शन घडवत प्रचाराला नवे बळ दिले व.सतरा प्रभागांत एकसंध शक्तिप्रदर्शन केले
या पती–पत्नींच्या समन्वयित प्रचारामुळे नेवासा शहरात भाजप–सेना युतीचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

