spot_img
spot_img
Homeराजकारणनेवासा शहराच्या रखडलेल्या विकासावर थेट बोट; ‘अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत आली तर शहर...

नेवासा शहराच्या रखडलेल्या विकासावर थेट बोट; ‘अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत आली तर शहर बदलेल’ – नामदार झिरवाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार


नेवासा : वर्षानुवर्षे विकासापासून दूर ठेवलेल्या नेवासा शहराचा कायापालट करण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संधी द्या, अन्यथा शहर पुन्हा मागेच राहील, असा थेट आणि आक्रमक इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी दिला. नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी शहरातील स्वच्छता, मूलभूत सुविधा व तीर्थक्षेत्र विकासाच्या रखडलेल्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ औदुंबर चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवानेते अब्दुलभैया शेख, तालुकाध्यक्ष अशोक मोरे, बाबा कांगुने, रावसाहेब फुलारी यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

झिरवाळ म्हणाले, दिंडोरीसारखे शहर स्वच्छतेत आदर्श ठरत असताना नेवासा मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. ही अवस्था बदलायची असेल तर शहर विकासाची जबाबदारी सक्षम नेतृत्वाच्या हाती द्यावी लागेल. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरासाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मागील कार्यकाळात सर्व समाजघटकांना सोबत घेत शहराचा विकास केला असून पुढील काळातही हाच विकासाचा धागा कायम राहील, असे सांगितले. शहर विकासासाठी सादर केलेल्या १५०० कोटींच्या प्रस्तावाला काही प्रमाणात मंजुरी मिळाल्याचे सांगत, नेवासा शहराला भविष्यात स्वतंत्र आध्यात्मिक ओळख देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

भाविकांसाठी सुसज्ज विश्रामगृहे, आधुनिक स्वच्छतागृहे, खेळाडूंसाठी क्रीडासंकुल तसेच व्यापाऱ्यांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देत जिल्ह्यातील सर्वात सुंदर शहर म्हणून नेवासाचा विकास केला जाईल, असा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला.

यावेळी युवानेते अब्दुल शेख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू यांनीही शहर विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देण्याचे आवाहन केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
24 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!