spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; डॉ. करणसिंह घुले नगराध्यक्ष….

नेवासा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; डॉ. करणसिंह घुले नगराध्यक्ष….

उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा1965 मतांनी पराभव

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांनी १९६५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगरसेवक पदासाठी निवडणूक भगवा फडकावला. 

क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नऊ नगरसेवक शिवसेना चार भाजपा दोन आम आदमी पार्टी एक व अपक्ष एक नगरसेवक विजयी

मतदानामध्ये शेवटच्या तासाभरात वाढलेले दहा टक्के मतदान आणि मतदारांनी क्रॉस वोटिंग करीत मनातील असलेले उमेदवाराला मतदान केल्या मुळे नेवासा शहरात सत्ता बदल झाला

17 प्रभागापैकी चार-सहा -दहा -बारा- तेरा या प्रभागांमध्ये नंदकुमार पाटील यांना मताधिक्य

मतमोजणीनंतर १७ सदस्यीय नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नऊ, भाजपचे दोन, शिवसेनेचे चार, आम आदमी पार्टीचा एक तर एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला.

नगराध्यक्ष पदासाठी अल्ताफ पठाण 1465 मते घेऊन तीन क्रमांक वर

प्रभाग क्रमांक दोन मधील आम आदमी पार्टीच्या सौ शालिनी या निवडणुकीत सुद्धा सर्वात जास्त म्हणजे 471 मतांच्या फरकाने विजय झाल्या तर प्रभाग क्रमांक पंधरा मधील भाजपा शहर अध्यक्ष मनोज पारखे यांच्या पत्नी सौ गीता याचा पराभव केवळ पाच मतांनी झाला

शालिनी सुखदान सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी तर गीता मनोज पारखे केवळ पाच मतांनी पराभूत

मागील कार्य काळामध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नऊ भाजपा सहा अपक्ष एक आणि एक काँग्रेसचे नगरसेवक होते

काल रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहिली असून तब्बल ७८ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजता नेवासा तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत सर्व निकाल स्पष्ट झाले.

 २२ केंद्रांवरील २२ ईव्हीएम मशीनमधील मतांची बेरीज झाल्यानंतर शिवसेनेचे डॉ. करणसिंह घुले यांचा अधिकृतरित्या विजय घोषित करण्यात आला.

विजयानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात फटाके फोडून व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त करण्यात आला. 

मिरवणुकीस बंदी असल्याने चौका-चौकात कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला. तहसील कार्यालयापासून श्रीरामपूर–शेवगाव मार्गापर्यंत कार्यकर्त्यांनी डॉ. घुले यांना खांद्यावर उचलून नेले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपचे सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे ज्ञानेश्वर माऊली पेचे यांच्यासह सेना-भाजपचे तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

. सुमारे पाच तास चाललेल्या आभार फेरीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा तीनशेहून अधिक ठिकाणी सत्कार करण्यात आला असून शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले.

विजय


नगराध्यक्ष -पदाचा निकाल
सचिन विलास कडू (६३५)
करण भाऊसाहेब घुले ७०७१विजय उमेदवार
दिनकर मोहन घोरपडे (२२०)
अल्ताफखान इमानखान पठाण(१४३१)
नंदकुमार लक्ष्मणराव पाटील(५१०६) क्रांतिकारी
अश्फाक रशीद शेख (५६) अपक्ष

विजयी उमेदवार नगरसेवक

प्रभाग १.(३८८) शिंदे जयश्री चंद्रकांत क्रांतिकारी

प्रभाग २.(७१९) सुखदान शालिन संजय आम आदमी पार्टी

प्रभाग ३.(५३३) मस्के अंकुश कचरू शिवसेना

प्रभाग ४ .(५४९) कुरे जितेंद्र भाऊसाहेब क्रांतिकारी

प्रभाग ५. (३८५ )महेश शंकर लोखंडे भाजप

प्रभाग ६ .(३१३) धोत्रे संभाजी शिवाजी क्रांतिकारी

प्रभाग ७.(४६५) परदेशी भारती कृष्णा शिवसेना

प्रभाग ८.(१६०) सरकाळे मेघा संदीप शिवसेना

प्रभाग ९. (५७२) डाळे शितल निरंजन भाजप

प्रभाग १०.(३२१) मापारी स्वप्निल उर्फ सागर राजेंद्र क्रांतिकारी

प्रभाग ११.(४३८) पठाण शहिदाबी इलायतखान क्रांतिकारी
प्रभाग १२.(४३०) चव्हाण सोनाली राहुल क्रांतिकारी

प्रभाग १३.(४९३) शेख नसिन मुक्तार क्रांतिकारी

प्रभाग १४.(५०२) व्यवहारे शोभा प्रताप क्रांतिकारी

प्रभाग १५.(२५१) गवळी प्रतिभा जालिंदर क्रांतिकारी

प्रभाग १६.(३४२) सरोदे प्रवीण शामराव अपक्ष

प्रभाग १७.(४५६) पवार अनिल भाऊसाहेब शिवसेना

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
21.1 ° C
21.1 °
21.1 °
38 %
3.8kmh
0 %
Thu
31 °
Fri
32 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
31 °

Most Popular

error: Content is protected !!