spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedवेश बदलला, वाहन बदलले,खिशात गुप्त कॅमेरा… आणि पूजा साहित्य विक्रेते तसेच लटकूंवर...

वेश बदलला, वाहन बदलले,खिशात गुप्त कॅमेरा… आणि पूजा साहित्य विक्रेते तसेच लटकूंवर प्रशासकांचे थेट स्टिंग ऑपरेशन…..

देवस्थानचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला भाविक लुटीचा अनुभव…

नेवासा


सामान्य शनीभक्ताचा वेष, वेगळे वाहन आणि खिशात गुप्त कॅमेरा…च्या मदतीने न्यायालयाच्या आदेशाने शनैश्वर देवस्थानचे प्रशासकपद स्वीकारलेल्या नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी थेट मैदानात उतरून शिंगणापूर भाविक लुटीचा स्वानुभव घेतला

. मेन गेटपासून खासगी पार्किंग, पूजा साहित्य विक्रेते आणि लटकूंच्या दमदाटीपर्यंत सगळी साखळी त्यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये टिपली गेली नाशिक आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या धक्का तंत्राने लटकू मध्ये आणि पूजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे


चालू वर्षातील शेवटचा शनिवारी, नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे लाखोंची गर्दी असताना, भाविकांना बळजबरीने खासगी पार्किंगकडे वळवणे, ५०–१०० रुपयांचे पूजा ताट थेट ११०० रुपयांना विकण्याचा प्रकार, ‘सभ्य’ भाषेत लपलेली सक्ती—हे सारे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर थेट देवस्थान कार्यालयात पोहोचत डॉ. गेडाम यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन परखड शब्दांत झाडाझडती घेतली.


भाविकाभिमुख कार्यपद्धती, दरफलक स्पष्ट लावणे, सक्ती थांबवणे आणि तक्रारी आल्यास कठोर कारवाई—असे ठोस आदेश देत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येवरही सवाल उपस्थित केला. प्रत्येक विभागप्रमुखाने आवश्यकतेचा सविस्तर अहवाल सादर करावा, असा इशाराही दिला.


या बैठकीस अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत भंडारी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, नगर भाग उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, तहसीलदार संजय बिरादार उपस्थित होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी गेडाम यांचा सत्कार केला

Oplus_131072


एकाच दिवशी—वेष बदलला, वास्तव पाहिले आणि कारवाईची दिशा ठरली.आता ‘भाविकांच्या लुटीवर आता थेट प्रशासनाची नजर रोखली गेली आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!