spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकश्री खंडोबा–म्हाळसादेवी मंदिरात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड; पुरातन धार्मिक परंपरेला नवे बळ

श्री खंडोबा–म्हाळसादेवी मंदिरात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड; पुरातन धार्मिक परंपरेला नवे बळ

खंडोबाच्या सासुरवाडी साठी नवीन पदाधिकारी

नेवासा (प्रतिनिधी)

— श्री खंडोबा–म्हाळसादेवी, सच्चिदानंद बाबा व नारद मुनी मंदिर ट्रस्ट (नोंदणी क्र. ए–१४९१) अंतर्गत नेवासा बु. मंदिर येथील विश्वस्तांच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. गोकुळ माधव जायगुडे, उपाध्यक्षपदी श्री. एकनाथ सखाराम रेडे, सचिवपदी श्री. एकनाथ रावजी डोहळे तर खजिनदारपदी श्री. रावसाहेब मोहिनीराज पेचे यांची निवड झाली.

. खंडोबाची सासुरवाडी असलेल हे मंदिर शतकानुशतके ग्रामदैवत म्हणून ओळखले हे श्री खंडोबा–म्हाळसादेवींच्या जागृत देवस्थानासह सच्चिदानंद बाबा व नारद मुनी यांच्या परंपरेमुळे या परिसराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. पौर्णिमा, जत्रा, पालखी, अभिषेक व विविध धार्मिक विधींमुळे भाविकांची मोठी श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे. ग्रामसंस्कृती जपणारे हे देवस्थान सामाजिक सलोखा आणि भक्तीभावाचे केंद्र मानले जाते.


निवडीप्रसंगी श्री. सुभाष किसन जपे, संतोष जगन्नाथ गायकवाड, अशोक नामदेव काळे, नामदेव सिताराम कुटे, श्री. सर्जेराव चव्हाण व अशोक सोन्याभाऊ मारकळी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अनुमोदन दिले.

आगामी काळात सर्व विश्वस्त व ग्रामस्थांना सोबत घेऊन मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, पुरातन परंपरा जपणे आणि धार्मिक कार्यक्रम अधिक भक्तिभावाने साजरे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या पौर्णिमेला विशेष कार्यक्रमाचे नियोजन असून नूतन पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!