नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव
नेवासा (प्रतिनिधी) : समाजहिताला प्राधान्य देत समाज व प्रशासनाला जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारांकडून होत असल्याचे प्रतिपादन सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक यांनी केले.
नेवासा प्रेस क्लबच्या पत्रकार दिन व पुरस्कार समारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. संस्थापक मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे यांनी प्रास्ताविकातून प्रेस क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे यांना पत्रकारिता कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ. निलेश लोखंडे यांना, तर सुविचार लेखनातील सातत्याबद्दल आदर्श शिक्षक विक्रम गोसावी यांना समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला
नेवासा प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचा प्रत्येक वर्षी प्रत्येकी 11 लाख रुपयांचा आरोग्य विभाग उतरवणारे पत्रकार मित्र विमा अधिकारी किशोर गारुळे साहेब यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला
.
पत्रकारांना मार्गदर्शन करताना जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी नेवासा आणि नगर जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास सांगत आधुनिक डिजिटलायझेशनच्या जगात पत्रकारिता करताना कोणती कौशल्ये आत्मसात करावी आणि कोणती साधन सूचिता पाळावी याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले व साधनांची निवड तसेच आचारसंहितेचे महत्त्व विशद केले.
प्रमुख भाषणात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर भाष्य करत पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तसेच. पुढील वर्षांपासून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा एकत्रित सन्मान सोहळा होईल व भव्य पत्रकार दिन साजरा करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. पत्रकार हा समाजातील केंद्रबिंदू घटक असून विरोधी पक्षांसह सर्वांना बरोबर घेऊन नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास सतीश मुळे सर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पेचे, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर जोजार, अॅड. काका गायके, नगरसेवक अॅड. संजय सुखदान, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, कृष्णा डहाळे, अॅड. सादिक शिलेदार, कल्याणराव उभेदळ, भरतकुमार उदावंत, अशोकराव आठरेसर, बालेंद्र पोतदार, किशोर गारुळे, राजेंद्र मुथ्था, संजय गायकवाड, आबासाहेब शिरसाठ, नगरसेवक महेश लोखंडे, जितेंद्र कु-हे, डॉ. राहुल चव्हाण, निरंजन डहाळे, असिफ पठाण, अंकुश म्हस्के, जालिंदर गवळी, संभाजी धोत्रे, संदीप सरकाळे, कृष्णा परदेशी, स्वप्नील मापारी, अनिल पवार, डॉ. मनिषा वाघ, माजी नगरसेविका डॉ. निर्मला सांगळे, अर्चना फिरोदिया, नंदिनी सोनवणे, भाऊसाहेब येवले, शिवसेना महिला आघाडीच्या शोभाताई आलवणे, रेश्मा लोखंडे शिक्षक अरविंद घोडके, संतोष भांबरे गुरुजी, उमाकांत कंक, प्रकाश गुजराथी, अंबादास लष्करे, नाथाभाऊ शिंदे, मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर, बाळासाहेब सोनवणे, अॅड. फरदिन पठाण, गणेश झगरे, सलीम सय्यद, शांतवन खंडागळे, बादल परदेशी, निखिल जोशी, इम्रान दारुवाले यांच्यासह नेवासा तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय आखाडे गुरुज यांनी केले तर नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आभार मानले

