spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकश्री. मोहिनीराज मंदिर देवस्थानात नूतन दगडी व्यासपीठाचे लोकार्पण .....

श्री. मोहिनीराज मंदिर देवस्थानात नूतन दगडी व्यासपीठाचे लोकार्पण …..

आठ फूट लांब आणि चार फूट उंच कलाकुसरीतून साकारलेले श्रद्धेचे दगडी व्यासपीठ

नेवासा येथील पुराण प्रसिद्ध श्री. मोहिनीराज मंदिर देवस्थानात आज शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६, माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) या शुभ मुहूर्तावर नव्याने बांधण्यात आलेल्या दगडी व्यासपीठाचे पूजन व लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला.

ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह.भ.प. श्री. देविदास महाराज म्हस्के, नेवासा शहराचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व सौ. घुले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून नगरसेवक स्वप्नील मापारी निरंजन डहाळे यांच्या हस्ते पूजा करून व्यासपीठाचे लोकार्पण करण्यात आले.

नेवासा येथील श्री. मोहिनीराज देवस्थानात उभारण्यात आलेले नूतन व्यासपीठ हे केवळ दगडी बांधकाम न राहता, भक्ती व कलाकौशल्याचा जिवंत संगम ठरले आहे. आठ फूट रुंद चार फूट रुंद व चार फूट उंचीचे दगडी महिरप व व्यासपीठ नांदेड येथील अत्यंत कुशल कारागिरांनी आपल्या कलात्मक हातांनी साकारले असून, त्यावर कोरलेल्या नाजूक व भावपूर्ण डिझाईन मंदिराच्या गाभाऱ्याला वेगळीच शोभा देत आहेत.

शब्दाविना श्रद्धा व्यक्त करणारी ही शिल्पकला पाहताच भक्तांचे मन भारावून जाते. व्यासपीठामुळे श्री. मोहिनीराज मंदिराच्या गाभाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून आले असून, संपूर्ण देवालय परिसरात दिव्यता व प्रसन्नतेचा अनुभव येतो. परंपरा आणि आधुनिक कलादृष्टी यांचा सुरेख मेळ साधणारे हे व्यासपीठ आज पासून सुरू होत असलेल्या मोहिनीराज यात्रेच्या भागवत कथेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू ठरणार असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे

या प्रसंगी रामभाऊ जगताप, रविंद्र जोशी, जयंत देवचक्के, डॉ. उदयकुमार बल्लाळ, नगरसेवक स्वप्नील मापारी, निरंजन डहाळे, राजू गुजराथी, महेश मापारी, संजय देशपांडे, प्रमोद देशपांडे, प्रसाद पाठक गुरुप्रसाद देशपांडे, दीपक गोसावी, विष्णुपंत बडवे, शंकरराव बडवे, विश्वनाथ बडवे, अनंत बडवे, नारायण बडवे, भरत बडवे, श्रीपाद बडवे, सुदर्शन बडवे व जयेश बडवे व समस्त बडवे पुरोहित मोठ्या संख्येने तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पौरोहित्य विष्णुपंत बडवे, नारायण बडवे व अनंत बडवे यांनी केले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
21.1 ° C
21.1 °
21.1 °
38 %
3.8kmh
0 %
Thu
31 °
Fri
32 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
31 °

Most Popular

error: Content is protected !!