spot_img
spot_img
Homeशेतीराष्ट्रीय स्तरावर कार्यरत किसान संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदीनरेंद्र पाटील काळे यांची निवड

राष्ट्रीय स्तरावर कार्यरत किसान संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदीनरेंद्र पाटील काळे यांची निवड


नेवासा
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी देशपातळीवर प्रभावीपणे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय किसान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नरेंद्र पाटील काळे यांची निवड करण्यात आली आहे. ही संघटना जम्मू–काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत कार्यरत असून राष्ट्रीय कार्यकारणी असलेली एकमेव किसान संघटना म्हणून ओळखली जाते.


संघटनेच्या या निवडीबद्दल भारतीय किसान श्रमिक जनशक्ती युनियनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी बालाजी त्र्यंबकराव (लातूर) यांनी नरेंद्र पाटील काळे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. ही निवड महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


ही संघटना देशातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न संघटितपणे मांडत असून, धोरणात्मक पातळीवर निर्णायक लढे उभारत आहे. महाराष्ट्रात संघटना अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकारणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शेतकरी प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


नरेंद्र पाटील काळे हे अनेक सेवाभावी व सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून, त्यांना संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. ते सध्या
जागतिक माणूस सुरक्षा फेडरेशनमहाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,
केळी बागायतदार संघ – महाराष्ट्र राज्य संचालक व प्रसिद्धी प्रमुख
या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न, अन्याय, कर्ज, बाजारभाव, पाणी, वीज, पीक विमा व धोरणात्मक अडचणी यावर संघटित आवाज उभारण्यासाठी ही संघटना कार्यरत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन नरेंद्र काळे यांनी केले आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
24 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!