spot_img
spot_img
Homeप्रशासननोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत सहलीनी नेवासा डेपोला कोटीचा...

नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत सहलीनी नेवासा डेपोला कोटीचा नफा


नेवासा : शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर येणाऱ्या नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सहलींमुळे नेवासा आगाराची चाकं जोमाने फिरली.

इतिहास, उद्योग, निसर्ग आणि देवदर्शनाच्या उद्देशाने निघालेल्या शालेय बस प्रवासामुळे केवळ विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व विस्तारले नाही, तर स्थानिक बाजारपेठेलाही चांगलीच चालना मिळाली.


या कालावधीत नेवासा आगाराला एकूण १ कोटी २४ लाख ३६ हजार २२४ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रशांत ज्ञानदेव होले यांनी दिली. नोव्हेंबरमध्ये २९ हजार २१६ किलोमीटर प्रवासातून १८ लाख ६९ हजार ८२४ रुपये, डिसेंबरमध्ये ८८ हजार ६६० किलोमीटर प्रवासातून ५६ लाख ७४ हजार २४० रुपये, तर जानेवारीत ७६ हजार ४४० किलोमीटर प्रवासातून ४८ लाख ९२ हजार १६० रुपये उत्पन्नाची नोंद झाली.


शाळांकडून मोठ्या प्रमाणावर झालेल्या बस आरक्षणामुळे आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, शिस्तबद्ध व वेळेत प्रवासासाठी चालक, वाहक व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचेही आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे


या संदर्भात आगार व्यवस्थापक प्रशांत ज्ञानदेव होले यांनी शैक्षणिक सहलींसाठी नेवासा आगारावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापनांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी आगार प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही दर्जेदार व विश्वासार्ह सेवा देण्याचा आगाराचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
37.3 ° C
37.3 °
37.3 °
14 %
4.5kmh
2 %
Wed
37 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
39 °
Sun
39 °

Most Popular

error: Content is protected !!