spot_img
spot_img
Homeशेतीडेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनमध्ये डॉ. रमेश हापसे यांची वरिष्ठ कार्यकारी सेक्रेटरीपदी नियुक्ती.....

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनमध्ये डॉ. रमेश हापसे यांची वरिष्ठ कार्यकारी सेक्रेटरीपदी नियुक्ती…..

नेवासा तालुक्याचा मान उंचावणारी निवड….


नेवासा
नेवासा बुद्रुक येथील रहिवासी तथा ऊस संशोधन क्षेत्रातील नामांकित शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांची पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या देशातील अग्रगण्य संस्थेत वरिष्ठ कार्यकारी सेक्रेटरी (ऊस संशोधक शास्त्रज्ञ) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे

.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन अंतर्गत देशभरातील सुमारे ३ हजार शास्त्रज्ञ कार्यरत असून, अशा प्रतिष्ठित संस्थेवर नेवासा तालुक्यातील शास्त्रज्ञाची निवड होणे ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.


डॉ. हापसे यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधन कारकिर्दीत ऊस पिकाच्या सुधारणा व वाण विकासात भरीव योगदान दिले आहे. को-०३१०२, व्हीएसआय-०८००५ तसेच व्हीएसआय-१८-१२१ या उच्च उत्पादक ऊस वाणांच्या विकासामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यासोबतच राष्ट्रीय स्तरावर ८६०३२ पायाभूत बेणे निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा त्यांच्या संशोधनातून पूर्ण झाला आहे.


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून प्रधान शास्त्रज्ञ म्हणून यशस्वी सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर पुन्हा एकदा त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती मानला जात आहे. या नियुक्तीमुळे नेवासा तालुक्याच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रतिमेला नवी उंची प्राप्त झाली आहे

या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले.तालुक्यातील विविध संस्था, शैक्षणिक संघटना व नागरिकांनी डॉ. हापसे यांचे अभिनंदन केले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
46 %
1.2kmh
100 %
Mon
28 °
Tue
36 °
Wed
38 °
Thu
37 °
Fri
36 °

Most Popular

error: Content is protected !!