spot_img
spot_img
Homeक्राइमदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा आरोपीला शीताफिने अटक ३

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा आरोपीला शीताफिने अटक ३

3जिवंत काडतुसे, १ मॅगझीन व मालवाहू वाहनासह जेरबंद; ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त



नेवासा, दि. १४ फेब्रुवारी २०२६

– नेवासा पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस हवालदार शहाजी आंधळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुकाणा गाव परिसरात नेवासा फाटा ते शेवगाव मार्गावर संशयित इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वरिष्ठांना कळवून कुकाणा येथील तरवडी चौकात सापळा रचण्यात आला.


दरम्यान, एमएच १६ सीडी ४४०५ क्रमांकाचे सुझुकी कंपनीचे सुपर कॅरी सीएनजी मालवाहू वाहन येताच पोलिसांनी ते थांबवून पंचासमक्ष तपासणी केली. वाहनातील संतोष कारभारी नरोटे (वय २२, रा. मोहरी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला मॅगझीनसह एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. मॅगझीन तपासली असता त्यात तीन जिवंत काडतुसे सापडली. पिस्तूलाबाबत परवान्याची विचारणा केली असता आरोपीने समाधानकारक उत्तर दिले नाही.


पोलिसांनी आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, ९०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे तसेच सुमारे ४ लाख रुपये किमतीचे सुझुकी सुपर कॅरी सीएनजी मालवाहू वाहन असा एकूण ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल डमाळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १११/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोसई अहिरे, पोहवा शहाजी आंधळे, पोशी अमोल डमाळे, पोशी संदीप ढाकणे तसेच होमगार्ड बाळू सावंत, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत घाडगे आणि श्रीधर लिपणे यांनी केली. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.1 ° C
32.1 °
32.1 °
23 %
1.6kmh
0 %
Sun
33 °
Mon
34 °
Tue
37 °
Wed
34 °
Thu
35 °

Most Popular

error: Content is protected !!