नेवासा(प्रतिनिधी)नेवासा नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या संकल्पनेतून नेवासा शहरातील विविध परिसरात राबविण्यात आलेल्या मासिक स्वच्छता अभियानात तीन टन कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली.या अभियानात सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
यावेळी झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये बाजार तळ परिसर,जिल्हा बँक परिसर,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड परिसर याठिकाणी जाऊन स्वच्छता दूतांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या संकल्पनेतून हे राबविण्यात येत असल्याने ते स्व:त या अभियानात हातात फावडे कुदळ घेऊन सहभागी झाले होते.
झालेल्या स्वच्छता अभियानात वृक्ष मित्र व सामाजिक कार्यकर्ते अमृत फिरोदिया,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सतीश मुळे सर,अनंता नळकांडे,जेष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान,रामभाऊ केंदळे,सोन्या चांदीचे व्यापारी बालेंद्र पोतदार,व्यापारी अब्बास बागवान, हमीद बागवान,संदीप आलवणे,युवा कार्यकर्ते संदीप भांड,आकाश देशमुख,योगेश आलवणे यांनी देखील या अभियानात सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.
स्वच्छता अभियानासाठी तीन कचरा गाड्या कचरा संकलन करण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या.नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली
तीर्थक्षेत्र नेवासा या भूमीचे वैभव वाढीसाठी सर्व नेवासकर नागरिकांनी दर महिन्याच्या १२ तारखेला सकाळी ७ ते ९ या वेळेत विविध परिसरात होणाऱ्या स्वच्छता अभियानात नेवासकर नागरिक या नात्याने सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी यावेळी बोलताना केले

